सांगली महापालिका निवडणूक: पुतन्याला निवडून आणण्यासाठी चुलत्याने वाटले पैसे

सांगली: पोलीसनामा आॅनलाइन
सांगली, मिरज, कुपवाड महानगर पालिका निवडणूकीचा प्रचार अंतिम टप्प्यात असताना, पुतण्याला निवडूण आणण्यासाठी चुलत्याने पैसे वाटले आहेत. या प्रकरणी प्रभाग क्र. 6 मधिल भाजपचे उमेदवार मुनेरा अमीर शरीकमसलत यांचे चुलते अजगर अल्लाउद्दीन शरीकमसलत यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
[amazon_link asins=’B07B6GG3RV’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’4a15e873-93ea-11e8-bcc6-7d2d8a3f85db’]
याबाबत सविस्तर माहिती अशी की, मागील काही दिवसांपासून सांगली, मिरज, कुपवाड महानगर पालिकेचा  शहरात सुरु असलेला प्रचार सोमवारी सायंकाळी पाच वाजता संपणार आहे. त्यामळे हा प्रचार अंतिम टप्प्यात असताना प्रभाग क्र. 6 चे भाजपचे उमेदवार मुनेरा अमीर शरीकमसलत. यांचा विजय होण्यासाठी त्यांचे चुलते अजगर अल्लाऊद्दीन शरीकमसलत यांनी मतदारांना मत देण्यासाठी प्रवृत करुन पैसे वाटण्याच्या उद्देशाने थांबले असल्याचे पोलिसांना दिसले. त्यांची चाैकशी केल्यानंतर त्यांच्याकडे असणाऱ्या अॅक्सेस 125 सीसी या मोटारसायकलच्या सीट खाली रोख रक्कम 2 लाख रुपये मिळाल्याने शरीकमसलत यांच्यावर मिरज शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भंडारी बाबा दर्गा चाैक येथे हे पैसे वाटण्याचे काम सुरु होते. ही घटना 30 जुलै रात्री 2.45 वाजता घडली.
मिरज शहरातील भाजप च्या कोणत्याच कार्यकर्तावर गुन्हा दाखल होणार नाही, अशी चर्चा होती. परंतु, हे प्रकरण गुन्हे शाखेचे प्रभारी अभिजित सावंत व त्यांचे टीमने मोठया शिताफीने उघङ पाडले. याचीच चर्चा सध्या मिरजमध्ये जोरदार सुरू आहे. या प्रकरणी अधिक तपास मिरज शहर पोलिस ठाणेचे डीवायएसपी धीरज पाटील, पी.एस.आय माळी करत आहेत.