सांगली  : खलाटी येथे डोक्यात दगड घालून तरुणांचा खून

येळवी :  पोलीसनामा ऑनलाईन

जत तालुक्यातील खलाटी येथे एका तरुणाचा डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना आज (शनिवार) उघडकीस आली आहे. तरुणाचा खून कोणत्या कारणामुळे करण्यात आला आणि कोणी केला हे अद्याप समजू शकले नाही. जत पोलीस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’953f0613-be40-11e8-b750-4b8e24684694′]

खंडू सिद्धू नाईक (वय-३० रा. खलाटी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, खंडू नाईक या तरुणाचा शुक्रवारी (दि.२१) रात्री दहाच्या सुमारास डोक्यात मोठा दगड घालून खून करण्यात आला. खलाटी येथील जिल्हा परिषदेच्या नवीन इमारतीमध्ये हा प्रकार घडला. खलाटीचे पोलीस पाटील भाऊसाहेब दर्याप्पा शेजूळ यांनी जत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. जत पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक गजानन कांबळे तपास करीत आहेत.

जांभळेवाडीतील तरूणाचा सुपारी देऊन खून

शिराळा – मांगले रस्त्यावर शिवाजी जाधव या युवकाचा अनैतीक संबंधातून खून करण्यात आला असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या युवकाचा आगोदर अपघातात मृत्यू झाल्याची नोंद पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. मात्र, तपासात हा अपघात नसून खून असल्याचे समोर आले. पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे.

[amazon_link asins=’B01DEWVZ2C,B00KGZZ824′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’20de2091-be41-11e8-9884-23b9d6e9bd4a’]

संशयित महादेव रामचंद्र सपकाळ (वय 36 रा.जांभळेवाडी), गौसुल अजमसलीम दिवाण (वय 26 रा.शिराळा), अभिजित आनंदा कांबळे (वय 26, मूळ रा.इंगरुळ ,सध्या रा.शिराळा), रोहित संजय गायकवाड (वय22 , रा.शिराळा) गणेश बाजीराव यादव (वय 21,रा.इंगरुळ) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. हा अपघात नसून  खून असल्याची तक्रार शंकर सदाशिव जाधव यांनी केली होती. त्यावरून पोलिसांनी तपास सुरू केला होता. मृत शिवाजी यांच्या मोबाईलवर एका नंबरवरून सतत फोन येत होते असे दिसून आले. त्यामुळे या व्यक्तीबाबत संशय येऊ लागला.

सिरियल रेपिस्टची वसई विरारमध्ये दहशत

पोलिसांनी दिलेली माहिती नुसार, जांभळेवाडी येथील महादेव सपकाळ यांच्या पत्नीशी  मृत शिवाजी याचे अनैतिक संबंध होते. त्यामुळे आठ महिन्यांपूर्वी महादेव याने गौसुल दिवाण याला बोलावून ‘तू शिवाजीचा खून कर . मात्र  खून करताना तो अपघात वाटला पाहिजे असे काम फत्ते कर’ असे सांगून चार लाख रुपयांची सुपारी दिली होती.  त्यापैकी 1 लाख 20हजार रुपये ही दिले होते.

पुणे/दौंड : जमिनीच्या वादातून आठ जणांवर गुन्हा दाखल

गौसुल दिवाणने शिवाजीचा काटा काढण्यासाठी अभिजित कांबळे याला मदतीसाठी घेतले.पहिला प्रयत्न  सहा महिन्यांपूर्वी केला होता. पण यावेळी  शिवाजीची मोटारसायकल  वेगाने निघून गेली होती. त्यामुळे  तो  प्रयत्न फसला होता. दि. 15 सप्टेंबररोजी त्याने शिवाजीला फोन करून जेवण व दारू पिण्यासाठी बोलावले होते. गौसुल, अभिजित, रोहित व गणेश यांनी शिवाजीला दारू पाजली. नंतर अभिजित कांबळे ज्या ठिकाणी राहत होता त्या खोलीवर शिवाजीला घेऊन गेले. त्याठिकाणी शिवाजीला आणखी दारू पाजली.  सर्वांनी खोलीवरच जेवण केले.जेवणानंतर मध्यरात्री एक ते अडीचच्या दरम्यान शिवाजीच्या तोंडावर उशी दाबून त्याला बेशुद्ध केले.  शिवाजी ठार झाला, की बेशुद्ध झाला हे संशयितांना समजले नाही. शिवाजीच्याच मोटरसायकलवरून  मध्यरात्री अडीचच्या दरम्यान अभिजित व रोहितने त्याला मांगले रस्त्यावरील गोरक्षनाथ मंदिराजवळील तोरणा नदीच्या पुलाजवळ नेले.  गौसुल दिवाण व गणेश यादव हे दोघे पुलाच्या दोन्ही बाजूंना थांबले होते. शिवाजी याला पुलावरून खाली फेकले. मोटारसायकल रेस करून तीही पुलावरून खाली ढकलली. त्यानंतर शिवाजीच्या डोक्यात दगड घालून तो ठार झाल्याची खात्री पटल्यावर सर्व संशयित पळून गेले.

[amazon_link asins=’B0784D7NFX,B071HWTHPH’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’e383f3dd-be40-11e8-8833-5b8290091f8a’]