सांगली खुनप्रकरण :  गुंड सनी कांबळे खुनानंतर ३५ ग्रुप रडारवर

सांगली  : पोलीसनामा ऑनलाईन

गुंड सनी कांबळे याच्या खुनानंतर त्याच्या समर्थकांच्या ३५ ग्रुपची स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाकडून चौकशी सुरु करण्यात येत आहे. सांगली, कपवाड मधील विविध ग्रपची चौकशी सध्य पथकाकडू सुरु असल्याचे पोलीस निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांनी दिली. गुंड रवी मानेचा मागील वर्षी वाढदिवस साजरा करणाऱ्या ग्रुपचा समावेश असल्याचेही पोलीस निरीक्षक पिंगळे यांनी सांगितले.
[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’615e8b30-c8bd-11e8-8a0b-058c1420c0f5′]

गुंड रवी मानेच्या खुनाचा बदला घेण्यासाठी बुधवारी गुंड सनी कांबळेचा डोक्यात कुकरीने वार करून खून करण्यात आला. त्यानंतर यामध्ये राष्ट्रवादीचा माजी पदाधिकारी जमीर रंगरेज याचाही सहभाग असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्याच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान अटकेतील पाचही संशयितांकडे चौकशी केल्यानंतर विविध ग्रुपद्वारे रंगरेज कार्यरत असल्याची माहिती पिंगळे यांना मिळाली. त्यानंतर त्यांनी अहिल्यानगर परिसरात गेल्या वर्षभरात विविध ग्रुपने केलेल्या कार्यक्रमांची माहिती घेतली.
[amazon_link asins=’B078M16N8P’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’71225697-c8bd-11e8-9a16-65ba2677be4a’]

त्यानंतर मृत गुंड रवी माने याच्या वाढदिवसानिमित्त गतवर्षी जुलैमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये अहिल्यानगरसह सांगलीतील विविध ग्रुपचा सक्रीय सहभाग असल्याचे स्पष्ट झाले आहे. या ग्रुपकडून दमदाटी, मारामारीसारखे गुन्हे केले जात असल्याचीही माहिती पिंगळे यांना मिळाली आहे. शिवाय अटक केलेले संशयित यातील एका ग्रुपचे कार्यकर्ते असल्याचेही स्पष्ट झाले आहे.
[amazon_link asins=’B07CRCPM4T’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’6881c7b5-c8bd-11e8-a725-4b7fd42c4a2d’]
त्यामुळे अहिल्यानगर, कुपवाड तसेच सांगली शहरातील विविध ग्रुपच्या चौकशीला प्रारंभ करण्यात आला आहे. या सर्व ग्रुपमधील प्रत्येक सदस्याला बोलावून चौकशी करण्यात येत आहे. शिवाय त्यांचा कोणत्या गुन्ह्यात सहभाग आहे का याचीही चौकशी करण्यात येत असल्याचे निरीक्षक पिंगळे यांनी सांगितले.

दरम्यान मृत गुंड रवी माने याचा गतवर्षी साजरा करण्यात आलेला वाढदिवसाचे नियोजन करण्यात राष्ट्रवादीचा माजी पदाधिकारी जमीर रंगरेजचा पुढाकार असल्याचे स्पष्ट झाले आहे. या कार्यक्रमाची संपूर्ण माहिती घेण्यात आली आहे. सध्या रंगरेज पसार झाला असून त्याचा कसून शोध सुरू आहे. त्याला पकडल्यानंतर त्याच्याकडे याबाबत कसून चौकशी करणार असल्याचेही निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांनी सांगितले.