मिरजेत चारित्र्याच्या संशयावरून पतीकडून पत्नीचा खून

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन – मिरज शहरातील रॉकेल डेपो झोपडपट्टी येथे पत्नीचा पतीने खून केला. सोनम माने असे मृत महिलेचे नाव आहे. तिच्या पतीने चारित्र्याच्या संशयावरून हा खून केल्याचे निष्पन्न झाले आहे. मंगळवारी रात्री २ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. याबाबत गांधी चौकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राहुल माने असे संशयिताचे नाव आहे.

सोनम व राहुल यांचा विवाह होवून अवघे १ वर्ष झाले होते. लग्नानंतर काही दिवस त्यांचा संसार सुरळीत सुरू होता. त्यानंतर काहीतरी कारणं काढून पती नेहमी पत्नी सोनम हिला वारंवार शिवीगाळ व मारहाण करीत होता. अनेकवेळा असा भांडणाचा प्रकार घडला होता. मंगळवारी रात्री सोनम व राहुल यांचे चारित्र्याच्या संशयावरून जोरदार भांडण झाले होते. ती भांडणे आजूबाजूच्या नागरिकांनी मिटविली होती.

परत रात्री २ च्या सुमारास भांडणे सुरू झाल्यानंतर राहुलने पत्नीवर चारित्र्याचा संशय घेवून सोनमच्या पोटाच्या उजव्या बाजूस चाकूने भोसकले. भोसकल्यानंतर राहुल तेथून पळून गेला. पोटात चाकू लागल्याने सोनमने आक्रोश केला. झोपडपट्टीतील सर्वजण जागे झाले. सोनमच्या मावशीने तिला तात्काळ शासकीय रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला.

Visit : Policenama.com 

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like