सांगलीतील सर्व दुकाने सोमवारपासून सुरू राहणार

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन – सांगली (sangli)  जिल्ह्यातील कोरोना (Corona) रुग्णाच्या संख्येत घट होत आहे. या पार्श्वभूमीवर आता राज्य सरकारच्या नियमानुसार जिल्हा प्रशासनाने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. गेल्या दोन महिन्यापासून इतर दुकाने बंद होती. आता सोमवार (दि. 14) पासून सकाळी 7 ते दुपारी 4 वाजेपर्यंत जिल्ह्यातील सर्व दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र, आटवड्यातील दोन दिवस म्हणजे शनिवार आणि रविवारी अत्यावश्यक सेवेत नसलेली दुकाने बंदच राहतील अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी दिली आहे.

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

सांगली (sangli) जिल्ह्याचा पॉझिटिव्हीटी रेट 5 ते 10 टक्केच्या आसपास आहे. तसेच आता प्राणवायू बेड सुद्धा 25 ते 40 टक्केच्या दरम्यान आहेत. टक्केवारीमध्ये सांगली जिल्हा तिसर्‍या स्तरावर गेला आहे. म्हणून अत्यावश्यक सेवा वगळता अन्य सेवांना देखील शिथिलता दिली गेली आहे. याची अंमलबजाणी सोमवारपासून केली जाणार आहे. क्रीडांगणे आणि मॉर्निंग वॉकसाठी मात्र यापूर्वी सकाळी 9 वाजेपर्यंत परवानगी देण्यात आली आहे. तसेच, चित्रपट, मालिका, जाहिरात इत्यादीचे छायाचित्रण करण्यास काही अटींवर परवानगी देण्यात आली आहे. तर राज्याबाहेरील कोणत्याही परीक्षा मंडळ, विद्यापीठ अथवा प्राधिकरणामार्फत जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येणार्‍या परीक्षांना परवानगी देण्यात आली आहे. सबंधित विभागाने जिल्हाधिकारी कार्यालयास संबंधित परीक्षेबाबत पूर्व कल्पना देणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. चौधरी यांनी सांगितले आहे.

हे सुरू राहणार –

– सर्व दुकाने सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते दुपारी 4 वाजेपर्यंत सुरु.
– जिल्ह्यात चित्रपट, मालिका चित्रीकरणास परवानगी.
– 50 टक्के क्षमतेने हॉटेल, रेस्टॉरंट, बार चालकांना व्यवसाय करण्यास परवानगी
– शासकीय, खासगी वाहतूक अत्यावश्यक सेवेतील सर्व व्यवहार नियमित सुरू राहणार.
– सलून, जीम सुरू राहणार क्रीडांगणे, मॉर्निंग वॉकसाठी सकाळी 9 पर्यंत परवानगी.
– राज्यातील बाहेर परीक्षांना परवानगी.

हे बंद राहणार –

– अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने शनिवार, रविवारी बंद राहणार.
– शाळा, महाविद्यालये, खासगी क्लासेस बंद.
– धार्मिक स्थळे, सिनेमा गृहे, मॉल्स, जलतरण तणाव, सभागृह बंद.
– भाजी मंडई वगळता सर्व आठवडे बाजार अद्याप बंदच राहणार.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

Web Title : sangli news | all shops in sangli start from monday

हे देखील वाचा

मोदी सरकारच्या मंत्रीमंडळात लवकरच खांदेपालट? ‘या’ नावाची जोरदार चर्चा

Sanjay Raut | …तर जळगावात शिवसेनेचा खासदार निवडून येईल

Pune News | अल्पवयीन मुलीचा विनयभंग प्रकरणातील आरोपीला जामीन