Sangli News | ‘म्हैसाळ भ्रूणहत्या प्रकरण लवकरच न्यायपटलावर’ – पालकमंत्री जयंत पाटील

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन – Sangli News | म्हैसाळ भ्रूणहत्या प्रकरणात (Mhaisal Feticide Case) शासनाने अद्यापर्यंत वकील न दिल्याने खटला न्यायालयाच्या बोर्डावर आला नाही. त्यामुळे या प्रकरणातील पीडित कुटुंबाने राज्याचे जलसंपदा मंत्री आणि सांगलीचे पालकमंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांची भेट घेऊन ही बाब निवेदनाद्वारे निदर्शनास आणली. त्यावर जयंत पाटील यांनी आश्चर्य व्यक्त करत हे प्रकरण लवकर न्यायपटलावर आणण्यात येईल. तसेच पीडित कुटुंबाला न्याय देण्याचे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले. (Sangli News)

म्हैसाळ येथील डॉ. खिद्रापूरे (Dr. Khidrapure) याच्या अघोरी उपचाराने मृत्यू झालेल्या स्वाती जमदाडे (Swati Jamdade) (रा. खंडेराजुरी) हिचे वडील सुनील जाधव (Sunil Jadhav), आई विजया जाधव (Vijaya Jadhav) यांनी जयंत पाटील यांची भेट घेतली. यावेळी सुधाकर जाधव (Sudhakar Jadhav), नगरसेवक विष्णू माने (Vishnu Mane), हरिदास पाटील (Haridas Patil), रवीकुमार हजारे (Ravi Kumar Hazare), बाळासाहेब होनमोरे (Balasaheb Honmore) उपस्थित होते. (Sangli News)

यावेळी त्यांनी पाच वर्षे झाले तरी न्यायालसमोर हे प्रकरण अद्यापपर्यंत आले नसून आरोपी मोकाट असल्याचे जाधव दाम्पत्यांनी सांगितले. यापूर्वीच्या तत्कालीन मंत्री, अधिकाऱ्यांनी हा खटला जलदगती न्यायालयात चालवून आरोपींना तत्काळ फाशीची शिक्षा देऊ असे आश्वासन आम्हाला दिले होते. पण पुढे काहीच झाले नाही. उलट खिद्रापुरेचा पुन्हा म्हैसाळ येथेच बिनबोभाटपणे दवाखाना सुरु आहे. या प्रकरणातील सर्व आरोपी बाहेर आहेत. शासनाने वकीलच न दिल्याने हा खटला न्यायालयाच्या बोर्डावरच आला नाही, असेही जाधव यांनी सांगितले.

यासंदर्भात जयंत पाटील यांनी आश्चर्य व्यक्त करत आपल्याला इतके वर्ष झाल तरी मला का सांगितल नाही? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. या प्रकरणाकडे मी तत्काळ लक्ष देतो. यासंदर्भातील सविस्तर माहिती घेऊन न्याय देण्याचा प्रयत्न करू, असे आश्वासन त्यांनी पीडित कुटुंबाला दिले.

Web Title :-  Sangli News | justice will be given to the victim family in mahisal feticide case says jayant patil

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा 

Pune Crime | जलतरण तलावात पोहताना दम लागल्याने 16 वर्षाच्या मुलाचा मृत्यू, कात्रज परिसरातील घटना

DGP Rajnish Seth | …तर राज ठाकरे यांच्यावर आजच कारवाई; DGP रजनीश सेठ ‘अ‍ॅक्शन’ मोडमध्ये

Daund MNS City President | मुस्लिमांच्या भावना दुखावल्याने मनसेच्या दौंड शहराध्यक्षांचा राजीनामा