Sangli News । 2 लाख 30 हजार रूपयांच्या लाचप्रकरणी तलाठी ACB च्या जाळ्यात, अप्पर तहसीलदार फरार

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन – Sangli News । माती वाहतूक (Transport) करणारे जप्त वाहन सोडण्यासाठी आणि कारवाई टाळण्यासाठी दोन लाख 30 हजार रुपयांची लाच,
(bribery) घेताना माडग्याळ (Madgyal) चे (ता. जत) तलाठी विशाल विष्णू उदगिरे (talathi Vishal Vishnu Udgire) (वय 37 रा. कसबे डिग्रज)
याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागा (Bribery Prevention Department) ने रंगेहात पकडले आहे.
मात्र , लाचेची रक्कम संख येथील अप्पर तहसीलदार हणमंत म्हेत्रे (Upper Tehsildar Hanmant Mhetre) यांच्या सांगण्यावरून घेतल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
तर अप्पर तहसीलदार म्हेत्रे हे फरार असल्याचं तपास अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. sangli news | talathi arrested by acb while taking bribe

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

अधिक माहितीनुसार, तक्रारदार हे त्यांच्या वाहनामधून माती वाहतूक (Soil Transport) करतात. त्यांची वाहने अप्पर तहसीलदार म्हेत्रे आणि तलाठी उदगिरे यांनी अडवून कारवाईसाठी जप्त केलीत.
या वाहनांवर कारवाई न करण्याकरिता आणि वाहने सोडण्याकरिता म्हेत्रे आणि उदगिरे यांनी तक्रारदार यांच्याकडे तब्बल अडीच लाख रुपये लाचेची मागणी केली होती.
तर त्याबाबतचा तक्रार अर्ज तक्रारदार यांनी 5 मे रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सांगली कार्यालयात दिला.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पथकाने आलेल्या तक्रारीनुसार चारवेळा पडताळणी केली. त्यामध्ये म्हेत्रे आणि उदगिरे यांनी तक्रारदार यांच्याकडे अडीच लाख रुपये लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले.
यानंतर संख येथील अप्पर तहसिलदार कार्यालय या ठिकाणी मंगळवारी (22 जून) रोजी म्हेत्रे यांच्या सांगण्यावरून 2 लाख 30 हजार रुपयांची लाच घेताना तलाठी उदगिरे याला लाचलुचपत पथकाने रंगेहात पकडले.
मात्र, म्हेत्रे हे फरार झाले. या दोघांवर उमदी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलं आहे.

दरम्यान, सरदची कारवाई पोलिस उपायुक्त राजेश बनसोडे, (Deputy Commissioner of Police Rajesh Bansode)  अप्पर पोलिस उपायुक्त सुरज गुरव, (Upper Deputy Commissioner of Police Suraj Gurav) यांच्या मार्गदर्शनाने पोलिस उपअधीक्षक सुजय घाटगे,
(Superintendent of Police Sanjay Ghatge)  पोलिस निरीक्षक गुरूदत्त मोरे,(Police Inspector Gurudatta More) प्रशांत चौगुले,
(Prashant Chowgule) अविनाश सागर, (Avinash Sagar), अजित पाटील,
(Ajit Patil) संजय संकपाळ, (Sanjay Sankapal ) राधिका माने, (Radhika Mane) संजय कलगुटगी,(Sanjay Kalgutgi) रविंद्र धुमाळ,
(Ravindra Dhumal) सलीम मकानदार, (Salim shopkeeper) प्रीतम चौगुले,(Pritam Chowgule) धनंजय खाडे,(Dhananjay Khade,)श्रीपती देशपांडे,भास्कर भोरे,
सीमा माने, चालक बाळासाहेब पवार यांनी केली आहे.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

Web Titel : sangli news | talathi arrested by acb while taking bribe

हे देखील वाचा

Pimpri News | पहिला विवाह झाला असताना लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार

‘डोंगर’ पोखरुन ‘उंदीर’ही नाही निघाला; परिवहन मंत्री अनिल परब यांना मोठा दिलासा

कोरोना झाल्यानंतर एवढ्या दिवसांपर्यंत शरीरात राहतात अ‍ॅन्टीबॉडी, वैज्ञानिकांनी सांगितलं

या’ 5 मसाल्यांना मिसळून बनवा इम्युनिटी बुस्टर काढा, जाणून घ्या कधी अन् कसा प्यायचा