Sangli News | पुराबरोबर आलेली मगर पाणी ओसरल्यानंतरही घराच्या छतावरच अडकून राहिली

सांगली न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) –  Sangli News । गेल्या काही दिवसापासून पाऊस धो धो बरसत आहे. पश्चिम महाराष्ट्रात तर पूरस्थिती निर्माण झालीय. कोल्हापूर (Kolhapur) आणि सांगली (Sangli) येथील पंचगंगा आणि कृष्णा नद्या तुडुंब भरून वाहत आहे. काही घरात पुराचे (Flood) पाणी देखील घुसले आहे. मात्र, सांगली शहरासह 5 तालुक्यांतील महापूर आता ओसरू लागला आहे. दुसरी गोष्ट म्हणजे, सांगलीत येथील पाण्यातून आलेल्या मगरींची (crocodile) धास्ती मात्र लागून राहिली आहे. सांगली जिल्ह्यालगत असणारे मौजे डिग्रज या छोट्याशा गावी मगर आणि सांगलीवाडी येथे मगरीचे 3 पिले (3 crocodile chicks) आढळून आली आहे.

सांगलीतील कृष्णा नदीमध्ये (Krishna river) मोठ्या प्रमाणात मगरींचा वावर आहे.
मात्र, येथील महापूर नियंत्रणात आल्यांनतर पात्राबाहेर पडलेल्या मगरींचे दर्शन आता शहरासह ग्रामीण भागात देखील होऊ लागले आहे. पावसाच्या झोताने मगर तशीच भिरकटत असते.
पाणी अधिक जमा झाल्यानं मगरीचा वावर अधिक होत आहे.
यामुळे महापुराबरोबर आलेली ही मगर पाणी ओसरल्यानंतरही घरावर आढळली आहे.
याबाबत एक प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
याचबरोबर तेथील जवळच सांगलीवाडी येथे देखील मगरीची चक्क तीन पिले आढळून आली.
या पिलांना नागरिकांनी महापुराच्या पाण्यात पुन्हा सोडण्यात आले.

या दरम्यान, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्याला पुराने वेढा मारला आहे.
त्यामुळे मिरज-कोल्हापूर रेल्वे मार्ग (Miraj-Kolhapur railway line) पूर्णपणे ठप्प झाला आहे.
दरम्यान, रेल्वेमार्ग दुरुस्तीचे काम करण्यात येत असल्याचे मध्य रेल्वेच्या पुणे विभागाकडून सांगण्यात आले आहे.


Web Title :
Sangli News | The crocodile that came with the flood remained stuck on the roof of the house even after the water receded

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Maharashtra Unlock | राज्यातील 14 जिल्ह्यांना लॉकडाऊनमधून दिलसा मिळण्याची शक्यता, यादी मुख्यमंत्र्यांकडे सादर

Pune Crime Branch Police | पुण्याच्या गुन्हे शाखेकडून तलवार, रेम्बो चाकूने केक कापणारे 2 ‘बर्थ डे’ बॉय गजाआड

Pune News | पन्नास टक्के शालेय फी कपातीची लोकजनशक्ती पार्टीची मागणी