Sangli News | दुर्देवी ! पाझर तलावात बुडून सख्ख्या बहिण-भावाचा मृत्यू

सांगली / जत : पोलीसनामा ऑनलाइन – सांगली (Sangli News) जिल्ह्यातील जत (Jat) तालुक्यातील उमराणी येथे आईसोबत कपडे धुण्यासाठी गेलेल्या सख्ख्या बहिण भावाचा पाझर तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना रविवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास घडली. सावित्री बाबुराव यादव (वय 13) व अभिजीत बाबुराव यादव (वय 11) अशी पाण्यात बुडून अंत झालेल्या बहिण भावाचे नाव आहे. (Sangli News)

 

याबाबत मिळालेली माहिती अशी की, उमराणी-सिदूर रस्त्यावरील यादव वस्तीनजीक कुराण पाझर तलाव आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचले असल्याने परिसरातील नागरिक या ठिकाणी कपडे धुण्यासाठी, जनावरांना पाणी पाजण्यासाठी येतात. रविवारी दुपारी त्या ठिकाणी सावित्री आणि अभिजित हे दोघे आई समवेत कपडे धुण्यासाठी आले होते. त्यावेळी पाण्यात खेळत असताना त्यांचा पाय गाळात रुतला. त्यातून बाहेर निघण्याचा प्रयत्न केला पण त्यात काही यश आले नाही अखेर दोघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. (Sangli News)

 

Web Title :- Sangli News | Unfortunate! Number of siblings drowned in Lake

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Band | राज्यात महाराष्ट्र बंदला उर्त्स्फुत प्रतिसाद !

Post Office Scheme | पोस्टाच्या ‘या’ 7 योजनांमध्ये करा गुंतवणूक, काही वर्षातच पैसे होतील दुप्पट; जाणून घ्या

Green Energy Sector | ग्रीन एनर्जी सेक्टरमध्ये Tata आणि Adani यांच्यावर आघाडी घेण्यासाठी मुकेश अंबानी यांनी खर्च केले 5800 कोटी; जाणून घ्या डिटेल्स