सांगली : गळवेवाडी खून प्रकरणातील आरोपीला सात महिन्यानंतर अटक

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन

आटपाडी तालुक्यातील गळवेवाडी येथे एका आठ वर्षाच्या मुलीवर बलात्कार करुन तिचा खून केल्याची घटना घडली होती. या घटनेतील आरोपी सात महिन्यांपासून फरार होता. पोलिसांनी शास्त्रीय तसेच परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे एका आरोपीला अटक केली असल्याचे पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. हे प्रकरण संवेदनशिल असल्यामुळे आरोपीचे नाव उघड करु शकत नसल्याचे सुहेल शर्मा यांनी सांगितले.

दि. 7 जानेवारी रोजी पीडित बालिका घराबाहेर खेळत असताना तिचे अपहरण करण्यात आले होते. त्यानंतर दुसर्‍या दिवशी जगमाई विहीरीत तिचा मृतदेह सापडला होता. तिच्यावर लैंगिक अत्याच्यार करून तिच्याच पँटने तिचा गळा आवळल्याचे स्पष्ट झाले होते. याबाबत पीडित मुलीच्या आजोबांनी फिर्याद दिली होती. याप्रकरणी 180 जणांकडे चौकशी करण्यात आली होती. पोलिसांकडून संशयिताला पकडण्यात न आल्याने ग्रामस्थांनी आटपाडी तहसील कार्यालयावर मोर्चाही काढला होता.
[amazon_link asins=’B075GZS76T’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’7a9aae66-9187-11e8-bfba-83a86bf310a6′]
दोन महिने तपासात कोणतीही प्रगती न झाल्याने संतप्त ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयावरही मोर्चा काढला होता. याप्रकरणी मुख्यमंत्री, पालकमंत्र्यांनाही निवेदने देण्यात आली होती. दरम्यान हे प्रकरण संवेदनशील असल्याने पोलिसांनी संयमाने याचा तपास सुरू ठेवला होता. याप्रकरणी सुमारे दहा जणांची पॉलिग्राफ चाचणी, तिघांची लायडिटेक्टर चाचणी, चौघांची ब्रेन मॅपिंग चाचणीही करण्यात आली होती.

घटनेला सात महिन्यांचा कालावधी पूर्ण झाला तरी संशयिताला अटक होत नसल्याने ग्रामस्थांतून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात होत्या. दरम्यान केलेल्या शास्त्रीय चाचण्यांसह परिस्थितीजन्य पुरावे मिळाल्यानंतर संशयिताला अटक करण्यात आली आहे. संवेदनशील प्रकरण असल्याने संशयिताचे नाव उघड करू शकत नसल्याचे अधीक्षक शर्मा यांनी यावेळी सांगितले. यामध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का याचाही तपास सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
[amazon_link asins=’B07637C9WJ’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’83d1b109-9187-11e8-a16c-87561d6639fa’]
अधीक्षक शर्मा, अतिरिक्त अधीक्षक शशिकांत बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली विट्याचे उपअधीक्षक अमरसिंह निंबाळकर, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक श्रीकांत पिंगळे, आटपाडीचे निरीक्षक आप्पासाहेब कोळी यांनी याचा गतीने तपास केला.

आमिष दाखवून बोलवले
पीडित मुलगी अंगणात खेळत असताना संशयिताने तिला कशाचे तरी आमिष दाखवून बोलावून घेतले. त्यानंतर तिच्यावर पाशवी अत्याचार केले. नंतर हा प्रकार उघड होऊ नये यासाठी त्याने त्या मुलीच्याच पँटने तिचा गळा आवळून खून केला. नंतर तिचा मृतदेह विहिरीत टाकून दिला होता.

वर्षापूर्वीही दोन बालिकांवर केले होते अत्याचार
दरम्यान गळवेवाडीतील बालिकेवरील अत्याचार आणि खून प्रकरणी संशयिताला पुराव्यानंतर ताब्यात घेतल्यावर त्याने गतवर्षी सप्टेंबरमध्ये परराज्यातून आलेल्या दोन अल्पवयीन मुलींवरही अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. मात्र पीडित मुलींचे पालक बाहेरच्या राज्यातून आल्याने त्यांनी याबाबत कोणतीही तक्रार दिली नव्हती. त्या दोन्ही घटना दबल्या गेल्याने संशयिताचे धाडस वाढले होते. त्यामुळेच जानेवारीत त्याने आठ वर्षीय बालिकेचा अत्याचार करून बळी घेतला. वर्षापूर्वी त्याने केलेल्या अत्याचार प्रकरणी त्याच्यावर बलात्कार आणि बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आल्याचेही अधीक्षक शर्मा यांनी सांगितले.