सांगलीत एटीएम फोडताना एकास अटक

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन – शहरातील शंभर फुटी रस्त्यावरील बँक ऑफ महाराष्ट्रचे एटीएम फोडताना एका युवकाला अटक करण्यात आली. ओंकार रामचंद्र कदी (वय 22, रा. हरभट रोड, सांगली) असे अटक केलेल्याचे नाव आहे. त्याच्याकडून एक दुचाकी, कतावणी, स्क्रू ड्रायव्हर असे साहित्य जप्त करण्यात आले आहे. विश्रामबाग पोलिसांनी ही कारवाई केली. याबाबत विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात गस्त घालून गुन्हेगारांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार विश्रामबागचे पोलिस निरीक्षक अनिल तनपुरे यांचे पथक गस्त घालत होते. शंभर फुटी रस्त्यावरील बँक ऑफ महाराष्ट्रच्या एटीएममध्ये एकजण मशीन फोडण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती निरीक्षक तनपुरे यांना मिळाली. त्यांनी पथकाला कारवाई करण्याचे आदेश दिले. पथकाने घटनास्थळी जाऊन एटीएम फोडतानाच संशयिताला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतल्यानंतर त्याच्याजवळ एक कतावणी, स्क्रू ड्रायव्हर सापडला. त्याची दुचाकी (एमएच 10 ए व्ही 9343) जप्त करण्यात आली. त्याच्याविरुद्ध विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Visit : Policenama.com