मिरजेत देशी बनावटीचे पिस्तूल जप्त, एकाला अटक

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन – मिरज शहरात एका व्यक्तीकडून देशी बनावटीचे पिस्तूल विक्री करण्यासाठी आलेल्या एकाला अटक करण्यात आली. त्याच्याकडून पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे. नागेश उर्फ कन्नड राजा चौगुले असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.
पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी जबरी चोरी, घरफोडी, मोटारसायकल चोरी यांसारखे गुन्हे करणाऱ्या आरोपींना तपासून गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला दिले होते.
Pistol
त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पथक आरोपींची माहिती घेत होते. रविवारी दुपारी पोलीस उपनिरीक्षक प्रदीप चौधरी यांचे पथक मिरज विभागात पेट्रोलिंग करत असताना हेड कॉन्स्टेबल साईनाथ ठाकूर यांना माहिती मिळाली कि मिरजेतील जवाहर चौकामध्ये एक इसम पिस्तूल विक्री करण्यासाठी येत आहे. त्या माहितीनुसार पथकाने जवाहर चौक येथे सापळा लावला असता नागेश चौगुले हा तिथे संशयित रित्या फिरताना दिसला. त्याला पथकातील कर्मचाऱ्यांनी ताब्यात घेत कसून चौकशी करत त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकमरेला एक देशी बनावटीचे पिस्तूल आणि जिवंत काडतूस आढळले.

पथकाने त्याला ताब्यात घेत त्याच्या विरुद्ध मिरज शहर पोलीस ठाण्यात आर्म अ‍ॅक्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे. त्याला हे पिस्टल कोठून मिळाले आणि तो कोणाला विक्री करण्यासाठी पिस्टल घेऊन आला होता याचा तपास आता पोलीस घेत आहेत.

Visit : Policenama.com 

शिंक कधीच दाबून ठेऊ नका, शरीरावर होऊ शकतात ‘हे’ गंभीर परिणाम
अभिनेत्री मलाइका अरोडा म्हणते, ‘खास डाएटपेक्षा नेहमी पौष्टिक आहार घ्यावा’
प्रेशर कुकर वापरताना ‘हे’ १० नियम आवश्य पाळा…आणि सुरक्षित रहा
मानसिक, शारिरीक आरोग्य चांगले ठेवायचे असेल तर ‘हे’ जरूर वाचा
उर्जा आणि उत्साह दिवसभर टिकवण्यासाठी ‘हे’ आवश्य करा, जाणून घ्या
संक्रमणापासून बचावासाठी करा; या विटॅमिनचा वापर, जाणून घ्या –
चांगल्या आरोग्यासाठी शरीराला दररोज किती कॅलरीजची असते आवश्यकता –
वजन कमी करण्याचा ‘हा’ आहे खास ‘जपानी फार्मुला’! जाणून घ्या