सांगलीत मोबाईल चोरट्यांना अटक

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन – रस्त्यावर मोबाईलवर बोलत जाणाऱ्या लोकांचे मोबाईल हिसका मारून चोरणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली. सांगली शहर पोलिसांनी ही कारवाई केली. त्यांना 1 दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

प्रतीक दिनकर पाटील (वय 26, रा. कारखाना परिसर), हर्षद हेमंत पाटील (वय 21, रा. कुपवाड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी चोरट्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार शहरचे पोलिस निरीक्षक अजय सिंदकर यांचे पथक गस्त घालत होते. पथकाने दोघांना संशयावरून ताब्यात घेतले. त्यांच्याकडे सखोल चौकशी केल्यानंतर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम परिसरात बोलत चाललेल्या एकाचा मोबाईल हिसका मारून चोरल्याची कबुली दिली. त्यांना अटक करण्यात आली.

visit : Policenama.com