सांगली : खून प्रकरणातील आरोपीला जत पोलिसांकडून अटक

येळवी : पोलीसनामा ऑनलाईन

जत तालुक्यातील खलाटी येथे आठ दिवसांपूर्वी झालेल्या खून प्रकरणात फरार असलेल्या आरोपीला जत पोलसिसांनी सापळा रचून अटक केली. खलाटी येथे आठ दिवसांपूर्वी सिद्धू नाईक यांचा खून झाला होता. ही कारवाई कवठेमहांकाळ तालुक्यातील आरेवाडी येथे करण्यात आली.
[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’eeba3ed2-c3ff-11e8-b88f-4bfc8679d3fa’]

पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, खलाटी येथे २० सप्टेंबर रोजी रात्री एक वाजता मिरवणुकीत खंडू सिद्धू नाईक हा  दारू पिऊन रस्त्यावर पडला होता. तेव्हा मिरवणुकीतील काहीजणांनी जिल्हा परिषद शाळेच्या समोर त्याला  झोपवले होते. याची माहीती आरोपी शिंदे याला मिळाली. नाईक हा आरोपी रावसो तुकाराम शिंदे याला वारंवार त्रास द्यायचा. सिद्धू नाईक याच्याकडून होणाऱ्या वारंवार त्रासाला वैतागला होता. या संधीचा फायदा घेऊन आरोपी रावसाहेब तुकाराम शिंदे (वय-४५ रा. खलाटी ता. जत) याने डोक्यात दगड घालून त्याचा खून करून पळून गेला होता.
[amazon_link asins=’B072SWSQ1F’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’f4064bc7-c3ff-11e8-a9ef-dd4dd8d18646′]

याबाबत जत पोलिसांनी अज्ञात इसम विरुद्ध गुन्हा दाखल केला होता. गेल्या चार दिवसात ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन कांबळे यांनी उपविभागीय पोलिस अधिकारी शर्मिष्ठा वालावलकर, पोलीस निरीक्षक राजीव तहसीलदार यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू केला. आरोपी हा गावातीलच असून ढालगाव आरेवाडी येथे लपून असल्याची माहिती मिळाली होती. शनिवारी दुपारी आरेवाडी येथे आल्याची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन कांबळे व त्यांच्या पोलिस पथकाने आरोपी शिंदे याला जेरबंद केले. चौकशी दरम्यान त्याने खून केल्याची कबुली दिल्याचे पोलीसांनी सांगितले.

मनसेच्या पुणे जिल्हाध्यक्षपदी संदीप सातव यांची नेमणूक

जाहिरात