सांगली : गांजा बाळगणाऱ्याला पोलिसांनी केली अटक

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन

गांजा जवळ बाळगणाऱ्या एका तरुणाला स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने अटक केली. ही कारावीई मंगळवारी (दि.१०) सकाळी हरिपूर रस्त्यावरील लिंगायत स्मशानभूमीजवळ करण्यात आली.

राहुल संभाजी बंडगर (वय 19, रा. धनगर गल्ली, खणभाग, सांगली) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे.
[amazon_link asins=’B07B7PTPB2′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’13a66b26-8455-11e8-8162-ef0c996649a6′]

महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर अंमली पदार्थाचे सेवन करणार्‍यांसह बाळगणार्‍यांवर कारवाईचे आदेश पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा, अतिरिक्त अधीक्षक शशिकांत बोराटे यांनी दिले आहेत. लिंगायत स्मशानभूमीजवळ राहुल गांजा बाळगून तो ओढत असल्याची माहिती पोलिस निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांना मिळाली होती. त्यांनी पथकाला कारवाईचे आदेश दिले होते.

पथकाने मंगळवारी सकाळी छापा टाकून त्याला रंगेहात पकडले. त्याच्याकडून 23 ग्रॅम गांजा, तीन चिलीम, गांजा ओढण्यासाठी लागणारे पांढरे कापड, 9 बिड्या असे साहित्य जप्त करण्यात आले. त्याच्याविरोधात सांगली शहर पोलिस ठाण्यात अंमली पदार्थ सेवन विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

निरीक्षक पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक अमितकुमार पाटील, राजू कदम, युवराज पाटील, अमित परीट यांच्या पथकाने ही कारवाई केली.