सांगली : कुमसगेच्या रत्ना बिअर शॉपीवर पोलिसांचा छापा, लाखो रुपयांचा बेकायदा साठा जप्त

सांगली :  पोलीसनामा ऑनलाईन

वाहतूक पोलिस समाधान मांटे यांच्या खूनप्रकरणातील संशयित कुमार कुमसगे याच्या विश्रामबाग येथील रत्ना बियर शॉपीवर आज (सोमवार) पोलीस उपअधीक्षक अशोक वीरकर यांच्या  पथकाने छापा टाकला. यामध्ये लाखो रुपयांचा बियरचा साठा जप्त करण्यात आल्याचे सुत्रांकडून समजतेय. या कारवाईत बिअर, वाईन व कोल्ड्रींक्सचाही साठा जप्त करण्यात आला. रात्री उशिरापर्यंत या साठ्याची मोजणी सुरु होती.
[amazon_link asins=’B0784D7NFX’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’04ec053d-8e98-11e8-924d-e72e7dc0fb08′]

मांटे यांच्या खूनप्रकरणात पुरावा नष्ट केल्याप्रकरणी हॉटेल रत्ना डिलक्सचा मालक कुमार कुमसगे याला अटक करण्यात आली आहे. त्याच्या मालकीची ही बिअर शॉपी आहे. विश्रामबाग पोलीस वसाहतीसमोर अवंतिका भूमी बिल्डर्स प्रोजक्ट्समध्ये पहिल्या मजल्यावर बियर शॉपी, तर तळघरात दोन गोदाम आहेत. याठिकाणी बेयकायदा बिअर साठा असल्याची माहिती मिळताच पोलिसांच्या पथकाने तेथे छापा टाकला. आषाढी एकादशीनिमित्त आज ड्राय डे होता. त्यामुळे रत्ना बियर शॉपी बंद होते. पोलिसांनी गोदामाचे कुलूप तोडून तपासणी केली. त्यावेळी दोन्ही गोदामात बियरचा बॉक्समध्ये मोठ्या प्रमाणात साठा आढळून आला. याशिवाय वाईन व कोल्ड्रींक्सचा साठाही सापडला. हा साठा जप्त करण्यात आला. या कारवाईची माहिती मिळताच राज्य उत्पादन शुल्कच्या अधीक्षक किर्ती शेडगे यांचे पथक दाखल झाले.

गेल्याच आठवड्यात कुमसगेच्या हॉटेल रत्ना डिलक्समध्य पोलीस शिपाई समाधान मांटे यांचा खून झाला होता. या खूनप्रकरणी कुमसगेला अटक झाली आहे. निवडणूक आयोगाच्या आदेशाने राज्य उत्पादन शुल्क विभागाने हॉटेलचा तसेच परमिट रुमचा परवाना रद्द केला आहे. ही कारवाई ताजी असतानाच आज पोलिसांनी त्याच्या बियर शॉपीवर छापा टाकून बेकायदा बियरचा साठा जप्त केल्याने खळबळ माजली आहे.
[amazon_link asins=’B078BNQ313′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’0b52f879-8e98-11e8-9300-8f45d7697ca8′]
पोलिस उपअधीक्षक अशोक विरकर, उपनिरीक्षक दादासाहेब बुधावले, हवालदार दिनेश माने, सिकंदर तांबोळी यांच्या पथकाने ही कारवाई केली.
सर्व साठा बेकायदा...
हा सर्व साठा बेकायदेशीर आहे. कुमसगे याच्या नावावर बियर शॉपीचा परवाना आहे. तोे कदाचित बाहेर याची विक्री करीत असावा, असा संशय आहे. तपासातून या बाबीचा उलघडा केला जाईल. कुमसगे याने आणखी कोठे साठा केला आहे का याचा तपास सुरू असल्याचे पोलिस उपअधीक्षक अशोक विरकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.