सांगलीत हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, एजंट महिलेसह घर मालकीण अटकेत

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन – शहरातील संजयनगरमधील यशवंतनगर येथील एका घरात सुरू असलेला हायप्रोफाईल वेश्या अड्डा उध्वस्त करण्यात आला. गुरुवारी रात्री अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली. याप्रकरणी एजंट महिला (वय 33, रा. मिरज), घर मालकीण (वय 25) यांना अटक करण्यात आली आहे. यावेळी एका पीडित महिलेची सुटका करण्यात आली. याप्रकरणी संजयनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी अवैध मानवी तस्करी करणार्‍यांविरोधात कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांनी अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक विभागाला गस्त घालण्याचे आदेश दिले होते. पथक गस्त घालत असताना यशवंतनगर येथील एका घरात हायप्रोफाईल वेश्या अड्डा सुरू असल्याची माहिती सहाय्यक निरीक्षक मायादेवी काळगावे यांना मिळाली.

त्यांनी यशवंतनगर येथील एका घरावर छापा टाकला. त्यावेळी एजंट ही वेश्या व्यवसाय करण्यासाठी मुली पुरवत असल्याचे स्पष्ट झाले. तर घर मालकीण भाड्याने घेतलेल्या घरात हा हायप्रोफाईल अड्डा चालवत अ सल्याचे स्पष्ट झाले. यावेळी वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडण्यात आलेल्या पीडित महिलेची सुटका करण्यात आली. दोघींनाही अटक करून संजयनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

निरीक्षक पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक मायादेवी काळगावे, भगवान नाडगे, विकास पाटणकर, लता गावडे, कविता पाटील, कविता गायकवाड यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Visit : policenama.com