सांगलीत आरएफायडी गस्त यंत्रणा : पोलीस अधीक्षक शर्मा

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन – जिल्हा पोलिस दलाने “आरएफआयडी’ ही अत्याधुनिक गस्त यंत्रणा प्रायोगिक तत्त्वावर सुरू केली आहे. सांगली-मिरज आणि कुपवाड या तीनही शहरातील तीनशे ठिकाणे निश्‍चित करण्यात आली आहे. यातून पोलिसांच्या गस्तीची ऑनलाईन हजेरी घेतली जाणार आहे. या अत्याधुनिक यंत्रणेमुळे गुन्हेगारी रोखण्यास मदत होईल अशी माहिती पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी पत्रकार परिषदेत दिली.

सांगली, मिरज, कुपवाड शहरासह कॉलनी भागात विविध ठिकाणी अशा तीनशे ठिकाणी मशिन बसविण्यात आल्या आहेत. या प्रणालीमुळे पोलिस कर्मचाऱ्यांना रात्रीची गस्त बंधनकारक झाली आहे. गस्तीला जाण्याण्पूर्वी संबंधित कर्मचारी “आरएफआयडी’द्वारे स्वत:चा अंगठा टेकवून गस्तीला सुरवात करेल. त्यानंतर ठरवून दिलेले पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पॉईंटवर प्रत्यक्ष जाऊन हजेरी नोंदविली जाईल. गस्ती पथकात असणाऱ्या पोलिसांकडे हे मशीन देण्यात आले असून त्यातून मिनिटाचे गस्तीपथक नियंत्रण कक्षात समजले जाणार आहे. तसेच या जीपीएस सिस्टीमही बनविण्यात आले असून पोलिस कोणत्या ठिकाणी गस्तीवर आहे, हे समजणार आहे. प्रत्येक गस्तीपथकातील कर्मचाऱ्यास 20 पॉईंट देण्यात आले असून रात्रीच्यावेळी संबंधित ठिकाणी पोहचले की नाही, हे समजणार आहे, असे शर्मा म्हणाले.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/