शिराळ्यात अल्पवयीन मुलीवर बलात्कार, एकाला अटक

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन – शिराळा येथे शुक्रवारी १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी तातडीने हालचाली करत बाजीराव उर्फ पिंटू बबन लोंढे ( वय ३८ ) याला अटक केली. शुक्रवारी सकाळी साडेअकरा च्या सुमारास ही घटना घडली. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने संशयिताला अटक केली.

शुक्रवारी सकाळी बाजीरावने पीडित मुलीला पेरू काढून देतो असे आमिष दाखवले घराजवळील गवतात नेऊन बलात्कार केला. त्याने दोन महिन्यांपूर्वीही असेच आमिष दाखवून शेतात नेऊन बलात्कार केला होता. आज ही माहिती पीडित मुलीने आईला सांगितली त्यानंतर याबाबत मुलीच्या आईने शिराळा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

त्यांनंतर पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी तातडीने याचा तपास करून संशयिताला अटक करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे अन्वेषण चे पोलिस निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांना दिले. पिंगळे याना शिराळा येथील नवजीवन वसाहत झोपडपट्टी मधील एकाने हे कृत्य केल्याची माहिती मिळाली. त्यांनी पथकाला कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार पथकाने बाजीरावला सापळा रचून ताब्यात घेतले. त्याच्याकडे अधिक चोकशी केल्यावर त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याला शिराळा पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले. निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अंतम खाडे, सचिन धोत्रे , कुबेर खोत , चेतन महाजन, सचिन कनप, सलमान मुलानी यांनी ही कारवाई केली.