जतमध्ये पैसे न दिल्याने आईचा खून, मुलाला अटक

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन – जिल्ह्यातील जत येथे पैसे न दिल्याने मुलाने चाकूने वार करून आईचा निर्घृण खून केला. शुक्रवारी रात्री साडेबाराच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी श्रीकांत राजाराम जाधव (वय 20) याला अटक करण्यात आली आहे. मंजुळा राजाराम जाधव (वय 45) असे मृत महिलेचे नाव आहे.

श्रीकांत ड्रायव्हर म्हणून काम करत होता. तो व्यसनाधीन होता. दारू पिणे, जुगार खेळणे या व्यसनाच्या पूर्णतः आहारी गेला होता. शुक्रवारी रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास त्याने आई मंजुळाकडे पैसे मागितले. आईने पैसे नसल्याचे सांगितले. त्याचा राग आल्याने श्रीकांतने आईवर चाकूने वार केला. त्यानंतर आईने आरडाओरडा केला. लगेच आजूबाजूला राहणारे लोक जमा झाले. तोपर्यंत मंजुळा मृत झाल्या होत्या. ही घटना घरासमोरील रस्त्यावर घडली. आई मृत झाली असल्याचे लक्षात येताच श्रीकांतने पळ काढला. जत पोलिसांनी तपासाची चक्रे अधिक गतिमान केली. श्रीकांतला सांगली येथून ताब्यात घेतले.

श्रीकांत याच्यावर जत पोलिसात आर्म ॲक्ट अंतर्गत व मारामारी प्रकरणी गुन्हे दाखल आहेत. श्रीकांतच्या वडिलांचे पूर्वीच निधन झाले आहे.

Visit : Policenama.com

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like