संभाजी भिडेंना संरक्षण न दिल्याने पाच पोलिसांचे निलंबन

सांगली: पोलीसनामा ऑनलाईन

कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणानंतर श्री शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांना पोलिस संरक्षण पुरविण्यात आले आहे. परंतु ,भिडे नुकतेच पुणे येथे गेले असता, त्यांच्या संरक्षणाच्या कर्तव्यावर असलेला एकही कर्मचारी त्यांच्यासोबत न गेल्याने पाचजणांना निलंबित करण्यात आले आहे. याबाबत सांगली पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी आज निलंबनाचे आदेश काढले आहेत.

याप्रकरणी, पोलिस कॉ. कोळेकर, पोलीस कर्मचारी कुंभार, संदीप पाटील (स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा), पाटणकर, शेटे (दोघेही पोलिस मुख्यालय) अशी निलंबित केलेल्या पोलिसांची नावे आहेत. कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत या पाचही जणांना निलंबित करण्यात आले आहे.

भीमा-कोरेगाव येथे झालेल्या हिंसाचाराच्या घटनेनंतर भिडे यांना पोलिस संरक्षण पुरवण्यात आले होते. त्यांना रोज चार पोलिस कर्मचार्‍यांचे संरक्षण होते. यासाठी सांगली शहर पोलिस ठाणे आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोलिसांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र , दि. 20 एप्रिल रोजी संभाजी भिडे काही कारणास्तव पुण्याला गेले होते. त्यावेळी त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी असलेले पोलिस त्यांच्यासोबत गेले नसल्याची माहिती समोर आली होती. भिडे यांची सुरक्षा महत्वाची असूनही कर्तव्यावर असलेले पोलिस त्यांच्यासोबत न गेल्याने कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत पाचही जणांना निलंबित करण्यात आले आहे. सांगलीचे पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी शुक्रवारी याबाबतचे आदेश दिले आहेत.

 संबंधित घडामोडी:

भीमा कोरेगाव प्रकरणी तयार केलेली सत्यशोधन समिती भाजपप्रणीत: संभाजी ब्रिगेड

कोरेगाव भीमा हिंसाचार हा पूर्वनियोजित कट, सत्यशोधन समिती अहवाल सादर

भीमा-कोरेगाव हिंसाचारग्रस्त कुटुंबातील साक्षीदार युवतीचा संशयास्पद मृत्यू

कोरेगाव भीमा प्रकरणी मिलिंद एकबोटे यांना जामीन मंजूर

भीमा-कोरेगाव येथील पिडीत ग्रामस्थ मुख्यमंत्र्यांना भेटणार

कोरेगाव भीमा दंगलतील गुन्हे मागे घेणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा

कोरेगाव-भीमा प्रकरणी शिक्रापूर पोलिसांकडून मिलींद एकबोटे यांची कसून चौकशी

भीमा कोरेगाव दंगल ही राज्य सरकार पुरस्कृत : जोगेंद्र कवाडे

भीमा कोरेगाव दंगल प्रकरणी मिलिंद एकबोटेच्या विरोधात अटक वॉरंट जारी