सांगली : मेसेज पाठवल्याच्या कारणावरून तरुणाचे अपरहण करुन मारहाण

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन

मित्राच्या काकीला चुकून सेंड झालेल्या मेसेजचा जाब विचारण्यासाठी तरुणाचे अपहरण करुन त्याला बेदम मारहाण करण्यात आली. हा प्रकार सांगली येथील कत्तलखान्याजवळील लोंढे मळा येथे सोमवारी (दि.11) घडला. याप्रकरणी जखमी तरुणाने सांगली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून त्याच्यावर सांगलीतील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत.

निखिल राजू शिकलगार (वय -१७ रा. सांगली) असे मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या फिर्यादी तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी कपिल शिंदे, किरण भंडारे, तांबरीस तांबोळी ,चाव्या , स्वप्नील आणि अतुल (संपूर्ण नाव माहित नाही) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी कि, सोमवारी दिनांक ११ जून रोजी सायंकाळी साडेनऊच्या सुमारास संजोग कॉलनी खण भाग सांगली येथील ज्ञानेशवर मंदिराजवळून निखिल जात असताना मित्र कपिल शिंदे याने त्याला चपराक मारून गाडीवर बसण्याची धमकी दिली . त्यानुसार घाबरून निखिल कपिल सोबत गाडीवरून गेला . ही मोटारसायकल सांगलीतील कत्तलकारखान्याजवळील लोंढे मळा येथे येऊन थांबवली . तिथे आधीपासूनच किरण भंडारे, तांबरीस तांबोळी ,चाव्या , स्वप्नील आणि अतुल यांच्यासह काही अनोळखी व्यक्ती होते. तेथे सर्वानी मिळून शिवीगाळ करीत निखिल याला मारण्यास सुरुवात केली.

त्यानंतर कपिल शींदे याने त्याची काकी लक्ष्मी शिकलगार यांच्या मोबाईलवर मेसेज का पाठवलास असा जाब निखिलला विचारण्यात आला. त्यावर हा मेसेज चुकून सेंड झाल्याचे निखिल ने सांगितले. त्यानंतर निखिल ला ताब्यात ठेऊन पाकिजा चौकात नेऊन पुन्हा मारहाण करण्यात आली. त्यानंतर रात्रभर ताब्यात ठेऊन ५० फुटी रोडवर नेऊन पुन्हा मारहाण केली . निखिलला शिवीगाळ करीत तोच प्रश्न पुन्हा पुन्हा विचारला जात होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास पुन्हा कत्तलखान्याजवळ आणले. तेथील शेतात नेऊन दोन बिअरच्या बाटल्या डोक्यात फोडून निखिल ला जखमी करण्यात आले. ही मारहाण इथेच थांबली नाही तर लोखंडी पाईपने त्याच्या पायावर जोरदार फटका मारण्यात आला.

त्यानंतर कपिलचा मित्र चिव्या निखिल ला मोटार सायकलवरून सराफ कट्टा येथे असलेल्या एका हॉटेलमध्ये घेऊन गेला . त्यावेळी तिथे कपिलची काकी लक्ष्मी शिकलगार हजार होती . तिने निखिलला मारहाण केल्याबद्दल कपिल आणि मित्राना शिवीगाळ केली . यावेळी कपिलने पोलिसात तक्रार केल्यास निखिलच्या बहिणीला पळवून घेऊन जाईन अशी धमकी दिली . त्यानंतर लक्ष्मी शिकलगार ने निखिल ला पन्नास रुपये दिले. त्यानंतर निखील रिक्षाने घरी गेला . तो गंभिर जखमी झाला होता घरी पोहचताच तो चक्कर येऊन खाली कोसळला . त्याच्या आई वडिलांनी त्याला सांगलीच्या सिव्हिल हॉस्पिटल मध्ये दाखल केले आहे. त्याच्यावर उपचार सुरु असताना निखिलकडून जबाब नोंदवण्यात आला. कपिल शिंदे आणि त्याच्या मित्रांच्या विरोधात फिर्याद दाखल करण्यात आली आहे.