सांगली : घरफोड्याच्या गुन्ह्यातील अट्टल चोरट्यास अटक

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन

चोर्‍या, घरफोड्यांच्या सहा गुन्ह्यात फरार असलेल्या अट्टल चोरट्यास अटक करण्यात आली. अजय बापू कांबळे (वय 23, रा. वाल्मिकी आवास योजना) असे त्याचे नाव आहे. सांगली शहर पोलिसांनी रविवारी मध्यरात्री ही कारवाई केली.
[amazon_link asins=’B078BNQ313′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’76e2654e-9997-11e8-b9fc-f779c3620aa3′]

अजय कांबळे या पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्यावर घरफोडी, चोरी, जबरी चोरी, खुनाचा प्रयत्न असे सहा गुन्हे सांगली शहर पोलिस ठाण्यात दाखल आहेत. तर विश्रामबाग पोलिस ठाण्यात 2, सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात चार, कुपवाड एमआयडीसी पोलिस ठाण्यात दोन, कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ व पेठवडगाव पोलिस ठाण्यात प्रत्येकी एक असे तब्बल 16 गुन्हे दाखल आहेत. या सर्व गुन्ह्यात पोलिसांना तो हवा आहे.

रविवारी रात्री तो वाल्मिकी आवास योजना परिसरातील त्याच्या घरी येणार असल्याची माहिती पोलिस निरीक्षक रविंद्र शेळके यांना मिळाली होती. त्यांनी पथकाला कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार रात्री दीडच्या सुमारास त्याला त्याच्या घरातून ताब्यात घेऊन अटक करण्यात आली. त्याला सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आले. त्याला दोन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
[amazon_link asins=’B07FCJNMW2′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’7d8e2863-9997-11e8-afa0-cf68eb5063ae’]

निरीक्षक शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक कैलास कोडग, उपनिरीक्षक गणेश शिंदे, अरूण औताडे, झाकीर काझी, विक्रम खोत यांच्या पथकाने ही कारवाई केली.