home page top 1

सांगली : अल्पवयीन मुलीला पळवण्याची धमकी, एकाला सश्रम कारावास

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन – गळवेवाडी (ता. आटपाडी) येथे एका अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन लग्न करण्याची धमकी दिल्याप्रकरणी एका युवकास दोन वर्षे सश्रम कारावास व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. विजय हरिश्‍चंद्र गळवे (वय 29) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश अब्दुल सत्तार पेरमपल्ली यांनी ही शिक्षा सुनावली. 19 नोव्हेंबर 2017 रोजी ही घटना घडली होती.

पीडित मुलगी तीच्या आई वडिलांसोबत गळवेवाडी येथे राहत होती. ती दहावीत शिकत होती. विजय पीडित मुलीचा काही महिन्यांपासून पाठलाग करत होता तो तीच्या शाळेकडे जात होता. घटने दिवशी पीडित मुलगी किराणा दुकानात गेली होती. तिथे विजय मित्रासह बसला होता. मुलीला पाहताच त्याने तिचा हात धरला. तु मला आवडतेस, माझ्याशी लग्न कर अन्यथा तुला पळवू नेईन अशी धमकी दिली. या प्रकाराने पीडित मुलगी घाबरली. तिने त्याच्या हाताला हिसका मारला आणि ती घरी गेली.

घरी गेल्यावर तिने याची माहिती आई वडिलांना दिली. त्यानंतर पीडित मुलीच्या आईने विजयला जाब विचारला तेव्हा त्याने तुम्हाला काय करायचे ते करा, तुमच्या मुलीला पळवून नेऊन लग्न करणार, अशी धमकी दिली. त्यानंतर पीडित मुलीने आटपाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. या गुन्ह्याचा तपास पोलिस उपअधीक्षक अमरसिंह निंबाळकर यांनी केला. सरकारपक्षातर्फे पाच साक्षीदार तपासण्यात आले. पीडित मुलगी, तिची आई व तपासी अधिकारी यांची साक्ष ग्राह्य ग्राह्य धरून शिक्षा सुनावण्यात आली.

Loading...
You might also like