सांगली : निवडणुकीमुळे मनपा क्षेत्रासह परिसरात तीन दिवस ‘ड्राय डे’

सांगली  : पोलीसनामा ऑनलाईन

निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर कोठेही अनुचित प्रकार घडू नेये यासाठी महापालिका क्षेत्रासह आजूबाजूच्या परिसरात मद्य विक्री बंद (ड्राय डे) बंद ठेवण्यात येणार आहे. अशी माहिती राज्य उत्पादन शुल्कच्या अधीक्षक कीर्ती शेडगे यांनी दिली.
[amazon_link asins=’B078BNQ313′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’a8767c9e-90f3-11e8-983a-69bc889a0ab0′]

निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर कोठेही अनुचित प्रकार घडू नयेत यासाठी प्रशासनाकडून दक्षता घेण्यात येत आहे. मतदानाच्या आदल्या दिवशी (३१ जुलै) व मतदानादिवशी (१ ऑगस्ट) महापालिका क्षेत्रासह माधवनगर, बुधगाव, इनाम धामणी, अंकली, कवलापूर, कुपवाड एमआयडीसी, कसबेडिग्रज, मिरज एमआयडीसी, पद्माळे, तानंग, सुभाषनगर, टाकळी या भागात पूर्ण दिवस ड्राय डे पाळण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

तर निकालादिवशी (दि. 3 ऑगस्ट) फक्त महापालिका क्षेत्रात पूर्ण दिवस ड्राय डे पाळण्यात येणार आहे. या काळात बेकायदा मद्य विक्री करणार्‍यांवर कडक कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही शेडगे यांनी दिला आहे.