सांगली : मिरजेत तृतिय पंथीयाचा चाकूने सपासप वार करून खून, एकाला अटक

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन – मिरजेतील शहर बस स्थानक जवळील एका कॉम्प्लेक्समध्ये गौस रज्जाक शेख उर्फ काजल.(वय 35 रा.सिद्धार्थ वसाहत कुरणे वाड्यामागे, मिरज ) या तृतीयपंथीयांचा खून करण्यात आला होता. मंगळवारी रात्री साडेबाराच्या सुमारास ही घटना घडली होती. याप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने तिघांना ताब्यात घेतले. मात्र एकाने हा खून केल्याचे स्पष्ट झाले आहे. लुबाडण्याच्या कारणावरून हा खून झाल्याचे सूत्रांनी सांगितले. याप्रकरणी मिरजेतील प्रथमेश तांदळे याला मुख्य संशयित म्हणून ताब्यात घेण्यात आले आहे.

मृत काजल बस स्थानक परिसरात रात्री नेहमीच थांबत असे. मंगळवारीही ती नेहमीप्रमाणे तेथे थांबली होती. रात्री साडेबाराच्या सुमारास एकासोबत ती एका कॉम्प्लेक्स मध्ये गेली. तेथे त्या दोघांचा वाद झाला. नंतर संशयितांने काजलवर चाकूने हल्ला केला. त्यात काजल गम्भीर जखमी झाली. नंतर संशयित पसार झाला. काजलने फोन करून मैत्रनिला याची माहिती दिली. नंतर तिला मिरजेच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे उपचार सुरु असताना तिचा मृत्यू झाला.

याप्रकरणी पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी तातडीने तपास करून कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण चे पोलिस निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांचे पथक तपास करत होते. प्रथमेश आणि त्याचे दोन साथीदार घटनास्थलाजवळ होते अशी माहिती निरीक्षक पिंगळे यांना मिळाली. त्यानी त्यानुसार तपास केल्यावर 3 संशयित सोलापूर येथे गेल्याचे स्पष्ट झाले. निरीक्षक पिंगळे यांच्या पथकाने तिघांना ताब्यात घेतले. त्यावेळी प्रथमेश याने काजल चाकूचा धाक दाखवून लुटण्याचा प्रयत्न करत होती. त्यामुळे तिच्या हातातील चाकू घेऊन तिच्यावर हल्ला केल्याचे सांगितले. नंतर त्याला ताब्यात घेण्यात आले. त्याला मिरज पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. निरीक्षक पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रदीप चौधरी, साईनाथ ठाकूर यांच्या पथकाने ही कारवाई केली.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like