सांगली : पत्नीच्या खूनाचा प्रयत्न, पतीला शिक्षा

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन – किरकोळ कारणावरून पत्नीच्या खूनाचा प्रयत्न करणाऱ्या पतीला ५ वर्षे सक्त मजुरी आणि ५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. दिनकर नलवडे असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे.

ही घटना १३ जुलै २०१७ रोजी सायंकाळी तासगाव तालुक्यातील मटकूनकी येथील नलवडे वस्ती येथे घडली होती. दिनकर याचे दीपालीशी २०१२ मध्ये विवाह झाला होता. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. दिनकर शेतीचे काम करीत होता. मागील दीड वर्षांपासून तो पत्नी दीपालीला कोणत्या ना कोणत्या कारणावरून त्रास देत होता.

या घटनेच्या एक वर्ष अगदोर दिनकरने दीपालीला कात्रीने मारले होते. दि.१३ जुलै २०१७ रोजी दिनकर शेतातील काम उरकून घरी आला. त्यावेळी हातातील काम उरकून चहा करून देण्यास दीपाली हिला उशीर झाला. त्यामुळे तो चिडला. त्याने खलबत्त्यातील लोखंडी ठोंबा दिपालीच्या डोक्यात मारला. त्यामुळे दीपाली बेशुद्ध पडली. त्यानंतर तिला सासरकडच्या मंडळींनी मिरजेच्या मिशन हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. दिपालीच्या डोक्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. दिपालीच्या भावाने दिनकरच्या विरोधात तासगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी घटनास्थळास भेट देऊन पंचनामा करून पत्नी व अन्य साक्षीदारांचे जाबजबाब नोंदवले होते. साक्षीपुराव्याच्या आधारे न्यायालयाने दिनकरला शिक्षा सुनावली.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like