‘सेक्स’ला नकार दिल्याने सख्या दिराने सपासप वार करून केला भावजईचा खून

जत (सांगली) : पोलीसनामा ऑनलाईन – अनैतिक संबंधांना विरोध केल्याने सुनीता भैय्याजी लोखंडे (वय ३०)  या महिलेवर तिच्या दिराने चाकूने भोकसून वार केले आहेत. यात त्या महिलेचा मृत्यू  झाला असून आरोपी  पांडुरंग कामू लोखंडे याला अटक करण्यात आली आहे. बरोबर त्याचा या खूनातील साथीदार संजय कृष्णा सोलनकर याला हि पोलिसांनी अटक केली असून हि घटना रविवारी रात्री साडे दहाच्या सुमारास घडली आहे. जत तालुक्यातील खिलारवाडी येथे हि घटना घडली असून या घटने बद्दल जत पोलिसांकडून माहिती मिळाली आहे.

जत तालुक्यातील खिलारवाडी येथील लोखंडे कुटूंबातील सर्वच माणसे  शेतमजुरीचे काम करतात. मयत सुनीता हीचा आरोपी पांडुरंग कामू लोखंडे हा सख्या दीर आहे. खिलारवाडी जवळच एका वस्तीवर हे लोक राहतात. रोज काबाडकष्ट करून हे लोक आपली गुजराण करत होते. अशातच मयत सुनीता हिच्याकडे दीर पांडुरंग शरीर संबंधाची मागणी करत होता. मयत सुनीता तिच्या  दिराच्या त्रासाला कंटाळून गेली होती. त्याच प्रमाणे ती अन्य कोणाला या बाबत काही सांगू हि शकत नव्हती. फक्त त्या दिराच्या अघोरी मागणीला ती सतत विरोध करत होती.

रविवारी रात्री साडे दहाच्या सुमार या मयत सुनीता अंगणात बसली असताना तिचा दीर पांडुरंग कामू लोखंडे त्याचा मित्र संजय कृष्णा सोलनकर याला घेऊन घरी आला. घरी कोणीच नसल्याचा फायदा घेत, मला शरीर संबंधाला विरोध का करतेस असा जाब विचारण्यास सुरुवात केली. तेव्हा हि सुनीताने त्याच्या मागणीस होकार भरला नाही.

याच गोष्टीचा राग मनात धरून पांडुरंगाने मयत सुनीताला घरात ओढत नेले. त्यानंतर त्याचा मित्र संजय याने हात पकडले आणि पांडुरंगाने सुनीताच्या पोटावर चाकूचे वार केले. त्या हल्ल्यात अतिरक्तस्त्राव झाल्याने सुनीताचा जागीच मृत्यू झाला आहे.  भैय्याजी लोखंडेयाने आज सकाळी जत पोलिसात तक्रार दिल्या नंतर हा सर्व प्रकार उघडकीला आला आहे. पोलिसांनी घटना स्थळी धाव घेऊन पंचनामा केला. त्या नंतर पोलिसांनी काही तासातच दोन्ही आरोपींना अटक केली आहे.