सांगलीत महिलेची साडेचार लाखांची फसवणूक

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन

इंटरनेटद्वारे मालाची ऑर्डर देऊन कंपनीच्या बँक खात्यावर पैसे आरटीजीएस करुनही माल मिळाला नाही. त्याबाबत संबंधित कंपनीला विचारणा केल्यानंतर त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे पैसेही मिळाले नाहीत व मालही मिळाला नसल्याचे महिलेची साडेचार लाख रुपयांची फसवणूक झाली आहे. याबाबत निशा प्रकाश तिग्याणी (वय ४८, रा. गणेशनगर, पाचवी गल्ली, सांगली) यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

तिग्याणी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार बंगलोर (कर्नाटक) येथील चिआरा ग्लोबल रिसोर्सेस प्रा. लि. कंपनीचे संचालक मनोहररेड्डी मरमरेड्डी रामचंद्ररेड्डी (रा. बेंगलोर, कर्नाटक) यांच्यावर फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

[amazon_link asins=’B07489945R’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’e119f2d1-7a26-11e8-a277-a99a55c1ed15′]

फिर्यादी निशा तिग्याणी यांनी इंटरनेटद्वारे रामचंद्ररेड्डी यांच्या चिआरा ग्लोबल रिसोर्सेस या कंपनीशी संपर्क साधला. तिग्यानी यांनी कंपनीची माहिती घेवून कंपनीकडून त्यांनी दि. ७ फेबु्रवारी २०१८ रोजी ऑप्टीमम न्युट्रीशन गोल्ड हे फूड सप्लीमेंट मागवले. यासाठी त्यांनी कंपनीच्या बँक खात्यावर ३६ हजार ४८० रुपये आरटीजीएस केले. कंपनीला पैसे मिळाल्यानंतर कंपनीने तिग्याणी यांची ऑर्डर पाठवली. त्यामुळे तिग्याणी यांचा कंपनीवर विश्वास बसला.दि. २१ फेबु्रवारी रोजी पुन्हा तिग्याणी यांनी कंपनीला ऑर्डर दिली. त्यासाठीचे ४ लाख ५६ हजार रुपयेही त्यांनी राजवाडा चौकातील एका बँकेतून कंपनीच्या खात्यावर आरटीजीएस केले. सदर रक्कम कंपनीच्या खात्यावर जमा झाली. तिग्याणी यांनी ऑर्डर लवकर पाठवण्याबाबत कंपनीचे रामचंद्ररेड्डी यांना सांगितले. त्यांनीही ऑर्डर पाठवून देतो असे सांगितले. मात्र, आठ ते दहा दिवसानंतरही तिग्याणी यांना माल मिळाला नाही. त्यांनी कंपनीशी संपर्क केला. मात्र, कंपनीकडून त्यांना उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. मात्र, तिग्याणी यांना माल मिळाला नाही. तिग्याणी यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. कंपनीच्या रामचंद्ररेड्डी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस हेडकॉन्स्टेबल राजेंद्र रेळेकर हे तपास करीत आहेत.