अ‍ॅन्टी करप्शन (लाच/ACB)सांगली

सांगली जिल्हा परिषद : लिपिक 25 हजाराची लाच घेताना अँटी करप्शनच्या जाळ्यात

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन –  सांगलीतील जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातील कनिष्ठ लिपिकाला २५ हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक पथकाच्या जाळ्यात सापडला आहे. अरुण योगिनाथ कुशिरे (वय, ५७, रा. उरुण, इस्लामपूर) असे त्या लिपिकाचे नाव आहे. हि घटना गुरुवारी दुपारी २ च्या सुमारास जिल्हा परिषदेत घडली आहे. जिल्हा परिषदेतच कनिष्ठ लिपिक लाच घेताना त्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे. अशी कारवाईबाबत माहिती काही वेळातच जिल्हा परिषदेत पसरली आहे.

अधिक माहितीनुसार, जिल्हा परिषदेच्या एका ठेकेदाराने केलेल्या कामांची बिले मिळण्यासाठी बांधकाम विभागाकडे प्रस्ताव दिला होता. तसेच कामासाठी ठेवलेल्या अनामतीची मुदत संपल्याने तीही मिळावी अशी विनंती देखील केली होती. दरम्यान, या कामाची फाईल मंजूर करण्यासाठी कनिष्ठ लिपिक अरुण कुशिरेने ठेकेदाराकडे ३५ हजार रुपये लाच मागितली होती. त्यानंतर ३५ पैकी २५ हजार रुपये गुरुवारी घेऊन येण्यास लिपिकाने सांगितले होते. यानंतर २५ हजाराची लाच स्वीकारताना त्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे.

Back to top button