११ वर्षांच्या सांगलीच्या उर्वीची कमाल; १४ हजार ४०० फुटांवरील ‘हमता पास’ ट्रेक यशस्वी

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन – मूळची सांगलीची पण सध्या वास्तव्यास गोव्यात असणाऱ्या ११ वर्षांच्या उर्वी पाटीलने मोठे धाडस करत एक विक्रम केला आहे. उर्वीने हिमालयातील पीरपंजाल रेंजमधील १४ हजार ४०० फुटांवरील ‘हमता पास’ सर केला आहे. फक्त ११ व्या वर्षात म्हणजे ‘हमता पास’ सर करणारी ती सर्वात लहान आणि पहिली महाराष्ट्रीय कन्या ठरली आहे.उर्वीची ही ट्रेकवारी पहिलीच नाही. तिनं यापूर्वीही सरपास ट्रेक पूर्ण केला आहे.

हमता ट्रेक असा केला सर

हमता ट्रेकची सुरुवात ३ जून २०१९ला झाली ती हिमाचल प्रदेशातील रुमसू बेस कॅम्पवरुन. कधी पाऊस तर कधी बर्फवृष्टी , कडाडणाऱ्या विजा आणि घोंगावणारा वारा अशीप्रतिकूल परिस्थिती असल्याने पहिले दोन दिवस वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी उर्वीने छोटे-छोटे ट्रेक केले. ५ जूनपासून प्रत्यक्ष ट्रेकला सुरुवात केली. या ट्रेक करताना तिनं एक एक टप्पा खूप हुशारीने यशस्वीपणे पार पाडला. त्यात रुमसू हा ६ हजार १०० फुटावरचा बेस कॅम्प, मग चिक्का (८,१०० फूट), जुआरु (९,८०० फूट) आणि बालुका गेरा(१२,००० फुट) असे एकूण चार कॅम्प करत तिनं १४ हजार ४०० फुटावरील हमता पास तिने सर केला. हमता पास हा कुलू आणि स्पिती व्हॅलीला जोडणारा जुना मार्ग आहे. यामार्गाला सिल्क मार्ग म्हणूनही ओळखले जाते.

दिवसाला ७ ते ८ तासांचा डोंगर-

दऱ्या आाणि बर्फातील हा प्रवास उर्वीने सलग पाच दिवसात पूर्ण केला. हे करताना शारीरिक आणि मानसिक क्षमतेचा कस लागल्याचे उर्वी सांगते. तसंच या ट्रेकिंगमध्ये बालुका गेरा ते रतनथळी व्हाया हमता पास हा ट्रेक सर्वाधिक अवघड होता. बालुका गेरा ते प्रत्यक्ष पासपर्यंत ८ तासांचा प्रवास पूर्णतः बर्फामधील असून सुमारे २,४०० फूट प्रत्यक्ष चढाईचे होते. याशिवाय १० हजार फुटांनंतर ऑक्सिजनचे प्रमाणही कमी होते. अशा प्रतिकूल परिस्थितीत सुरुवातीला पाऊस आणि पासवर बर्फवृष्टी असल्याने ट्रेक पूर्ण करताना दमछाक होत होती. पण अशा अवघड पासवर पोहचल्याचा आनंदच काही और होता, असं उर्वीने सांगितलं. तसंच हिमालयातील हमतापास हा अवघड ट्रेक असल्याने मला मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त राहणे गरजेचे होते. यासाठी आहार, व्यायाम आणि योगा यावर लक्ष केंद्रित केले. सकाळी दोन तास समुद्र किनारपट्टीवरील वाळूत चालायचे. अर्धा तास योगा आणि खास जिम करायचे, असंही तिनं सांगितलं.

दरम्यान, उर्वीचं एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठण्याचे ध्येय आहे. अवघड अशा सर पाससह हमता पास सर केल्याने माझ्यातील आत्मविश्वास दुणावला आहे. जगातील सर्वात अवघड एवरेस्ट शिखर सर करण्याच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल असेल. तसंच पुढील वर्षी पीन पर्वती आणि एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठण्याचे ध्येय आहे, असंही उर्वी आत्मविश्वासाने सांगते.

पाहिल्या पाऊसाचा आनंद घ्या मनसोक्त, बिनधास्त भिजा

ठाण्यातील ६६ वर्षीय ब्रेनडेड महिलेचे अवयवदान

रात्री बेडवर पडल्यावर महिला कोणता विचार करतात ?

विद्यार्थ्यांचा शोध, आंब्याच्या पानांपासून तयार केले मद्य

You might also like