Sangola Accident | सांगोला तालुक्यात ट्रक-कारचा भीषण अपघात; कार चालकासह 2 लहान मुलींचा मृत्यू

सांगोला न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) –  Sangola Accident । सांगोला (Sangola) तालुक्यातील कारंडेवाडी (Karandewadi) फाट्याजवळ एक भीषण अपघात झाला आहे. मालवाहतूक ट्रकने कारला (Truck-Car Accident) समोरून जोरात धडक दिल्याने झालेल्या अपघातात (Accident) कार चालकासह 2 लहान मुलींचा मृत्यू (three died) झाला आहे. तसेच अन्य 9 जण जखमी झाले आहेत. ही घटना रविवारी (1 ऑगस्ट) रोजी सायंकाळी सातच्या दरम्यान घडली आहे. चालक दाजीराम लक्ष्मण शिंगाडे (रा. उदनवाडी, ता. सांगोला) आणि प्रवासी कावेरी मनोज हरीजन (वय 7, रा. निरलगी, ता. ताळेकोटी, जि. विजापूर), गुड्डी चंद्रकांत मगिरी (वय 8, रा. कोंडगोडी, ता. जेवरगी, जि. गुलबर्गा) हे 3 जण ठार झाले आहेत.

अधिक माहितीनुसार, रविवार 1 ऑगस्ट रोजी सांयकाळी 7 वाजण्याच्या सुमारास कार चालक दाजीराम लक्ष्मण शिंगाडे हा ओम्नी (VAN) कारमधून उदनवाडी (झापाचीवाडी, ता. सांगोला) येथून 3 पुरुष,
3 महिला, 6 लहान मुलांना घेऊन कर्नाटक येथील सिंदगी येथे जात होता.
करांडेवाडी फाट्याजवळ उजव्या बाजूला असणाऱ्या सर्व्हिस रोडने जात असताना
समोरुन भरधाव वेगाने येणाऱ्या मालवाहतूक ट्रकची कारला समोरुन जोरात धडक बसली.

या दरम्यान, या जोराच्या झालेल्या अपघातामध्ये (Accident) ओम्नी (VAN) चालक दाजीराम शिंगाडे (Dajiram Shingade) आणि प्रवासी कावेरी मनोज हरीजन (Kaveri Manoj Harijan,),
गुड्डी चंद्रकांत मगीरी (Guddi Chandrakant Magiri) हे तिघे गंभीर जखमी झाले, यांनंतर त्याचा मृत्यू झाला आहे.
कारमधील अन्य लोक आणि लहान मुले असे एकूण 9 जण जखमी झाले आहेत.
दरम्यान, याप्रकरणी मालवाहतूक ट्रक चालकाविरुद्ध माणिक शिंगाडे (रा. उदनवाडी,) यांनी फिर्याद दिलीय.

 

Web Title : Sangola Accident | terrible accident near karandewadi three killed including two girls in sangola taluka of solapur district

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune Crime | पुण्यात सहायक पोलीस निरीक्षकावर (API) बलात्काराचा गुन्हा दाखल

Modi Governement | बदलली बाईकवर मागे बसण्याची पद्धत ! आता असा करावा लागेल प्रवास, जाणून घ्या काय आहे मोदी सरकारचा नियम

Pune Ganeshotsav | पुणेकरांना गणेशोत्सवासाठी महापालिकेने जारी केल्या मार्गदर्शक सूचना