रणवीरने शेअर केले संग्राम भालेरावचे व्यंगचित्र

मुंबई: पोलीसनामा ऑनलाईन
रोहित शेट्टी दिग्दर्शित  ‘सिम्बा’ या चित्रपटातून अभिनेता रणवीर सिंह पुन्हा एकदा मराठी माणसाची भूमिका साकारत आहे. ‘बाजीराव मस्तानी’मधील रणवीरने साकारलेली बाजीराव ही मराठी भूमिका चाहत्यांना प्रचंड आवडली होती. आता रणवीर ‘सिम्बा’ या चित्रपटात ‘संग्राम भालेराव’ची भूमिका साकारणार आहे. विशेष म्हणजे बाजीराव आणि अल्लाऊद्दीन खिलजीची भूमिका साकारणारा रणवीर या चित्रपटात पोलिसाच्या भूमिकेत दिसणार आहे. धर्मा प्रोडक्शनचा हा चित्रपट येत्या डिसेंबर महिन्यात प्रदर्शित होणार आहे.
[amazon_link asins=’B01F7AX9ZA’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’acbffced-7eba-11e8-adf2-8977b9104098′]
‘सिम्बा’हा  चित्रपट  2015 रोजी रिलीज झालेल्या तमिळ चित्रपटाचा रिमेक आहे. या चित्रपटाचे नाव टेंपर होते. पुरी जगन्नाध यांनी या चित्रपटाला दिग्दर्शित केले होते. तर ज्युनिअर एनटीआर याची प्रमुख भूमिका होती.
टेंपर  हा चित्रपट एका भ्रष्ट पोलीस अधिकाऱ्यावर अवलंबून आहे. या अधिकाऱ्याचा संबंध तस्करीशी असतो. त्यानंतर तो एका योग्य मार्गाचा अवलंब करतो. रणवीरचा आणि साराचा हा सिम्बा चित्रपट २८डिसेंबर २०१८ रोजी रिलीज होत आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण हैदराबाद येथील रामोजी राव फिल्म सिटीत सुरू आहे.