शरद पवारांच्या सभेत आ. जगताप समर्थकांकडून माजी महापौरास धक्काबुक्की !

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – महानगरपालिकेचे माजी महापौर अभिषेक कळमकर यांना विद्यमान आमदार संग्राम जगताप यांच्या समर्थकांकडून धक्काबुक्की झाल्याचा आरोप कळमकर यांनी केला आहे. त्यांनी थेट गुन्हा नोंदवण्यासाठी कोतवाली पोलिस स्टेशन गाठले आहे. शरद पवार यांच्या सभेत हा प्रकार आज दुपारी घडला.

आज नगर शहरामध्ये नंदनवन लॉन येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची सभा होती. या सभेनंतर शरद पवार बाहेर पडत असताना त्यांच्यामागे हा प्रकार घडला आहे. कळमकर यांना धक्काबुक्की झाल्यानंतर त्यांनी जगताप समर्थकांविरुद्ध तक्रार नोंदवण्यासाठी थेट कोतवाली पोलिस ठाणे गाठले. त्यामुळे कोतवाली पोलीस ठाणे आवारात कळमकर समर्थकांची गर्दी झाली होती.

यापूर्वी युवक आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष किरण काळे यांनी जगताप समर्थकांकडून मारहाण झाल्याचा आरोप पक्षाच्या प्रदेश पातळीवरील नेत्यांसमोर केला होता. त्यानंतर पुन्हा एकदा माजी महापौर कळमकर यांना धक्काबुक्की झाली. कळमकर हे नगर शहर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून इच्छुक आहेत.

Visit – policenama.com 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like