अखेर आ. संग्राम जगताप यांना नगर दक्षिणमधून राष्ट्रवादीची उमेदवारी

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन- अखेर राष्ट्रवादी काँग्रेसने आ. संग्राम जगताप यांना नगर दक्षिणमधून लोकसभेची उमेदवारी जाहिर केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासुन नगर दक्षिणच्या जागेवरून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वाद चालु होते. शेवटी राष्ट्रवादीने ही जागा काँग्रेससाठी सोडली नाही. त्यामुळे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांचे सुपुत्र डॉ. सुजय विखे-पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस कोणाला उमेदवारी जाहिर करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. त्यातच आज (बुधवारी) राष्ट्रवादीने आ. संग्राम जगताप यांना लोकसभेसाठी उमेदवारी जाहिर केली आहे.

आ. संग्राम जगताप हे भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले यांचे जावाई आहेत. आ. अरूण जगताप यांचे देखील नगर दक्षिणच्या लोकसभेसाठी नाव चर्चेत होते. पक्षश्रेष्ठी देखील संभ्रमात पडली होती. अखेर राष्ट्रवादी काँग्रेसने आ. संग्राम जगताप यांना उमेदवारी दिली आहे. डॉ. सुजय विखे-पाटील यांना अद्यापही भाजपने लोकसभेची उमेदवारी दिलेली नाही. मात्र, आगामी काळात डॉ. सुजय विखे-पाटील आणि आ. संग्राम जगताप यांच्यामध्ये सामना रंगु शकतो अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. डॉ. सुजय विखे-पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला त्यावेळी आ. शिवाजी कर्डिले हे देखील त्यांच्यासोबत होते. आता आ. शिवार्जी कर्डिले लोकसभा निवडणुकीत काय भुमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
WhatsApp WhatsApp us