भोरमध्ये संग्राम थोपटे यांचा निसटता विजय

भोर : पोलीसनामा ऑनलाइन – भोर मतदारसंघात अत्यंत अटीतटीच्या झालेल्या लढतीत संग्राम थोपटे यांचा विजय झाला आहे. त्यांनी शिवसेनेच्या कुलदीप कोंडे यांचा 2530 मतांनी पराभव करत विजयाची हॅट्रिक साधली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार संग्राम थोपटे, शिवसेना-भाजपा युतीचे कुलदीप कोंडे आणि अपक्ष आत्माराम कलाटे यांच्यामध्ये तिरंगी लढत होती. त्यात संग्राम थोपटे यांना 91545 मते मिळाली तर कुलदीप कोंडे 98007 मते मिळाली.

भोर मतदारसंघात चार दशके थोपटे पिता-पुत्रांची सत्ता आहे. 1999 मधील राष्ट्रवादीचा अपवाद वगळता मतदारसंघाने कायम काँग्रेसला साथ दिली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अनंतराव थोपटे यांनी मतदारसंघाचे सहा वेळा नेतृत्व केले. 2004 पासून संग्राम थोपटे या मतदार संघात प्रतिनिधित्व करत आहेत. मागील विधानसभा निवडणुकीतही भोर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस च्या संग्राम थोपटे यांनी 78 हजार 602 एवढी मते घेत शिवसेनेचे कुलदीप कोंडे यांचा पराभव केला होता.

या मतदारसंघात तिकीटासाठी युतीच्या उमेदवारांमध्ये शेवटपर्यंत रस्सीखेच सुरु होती. अखेर कुलदीप कोंडे यांनी बाजी मारली आणि युतीचे तिकीट मिळविले. परंतु युतीच्या उमेदवारीसाठी आग्रही असलेले नाराज आत्मराम कलाटे यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली.

Visit : Policenama.com