Sania and Shoaib Divorce | शोएब आणि सानियाच्या घटस्फोटाची चर्चा पण दोघांनी केली ‘ही’ घोषणा

पोलीसनामा ऑनलाइन – भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा (Sania Mirza) आणि पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिक (Shoaib Malik) यांच्या नात्यात सर्व काही सुरळीत चालूं नसल्याची (Sania and Shoaib Divorce) चर्चा अनेक दिवसांपासून सुरु आहे. त्यानंतर दोघे लवकरच घटस्फोट (Saniya and Shoaib Divorce) घेणार असल्याची चर्चा सुरू झाली होती. पण या जोडीने सर्वांसमोर येऊन वेगळी घोषणा केली आहे. सानिया आणि शोएबनं एका नवीन टॉक शोची घोषणा केली आहे. या शोचे सूत्रसंचालन सानिया आणि शोएब करताना दिसतील. ‘मिर्झा मलिक शो’ (Mirza Malik Show) असे या कार्यक्रमाचे नाव आहे.

 

पाकिस्तान (Pakistan) आणि यूएईमधील (UAE) माध्यमांनी सानिया आणि शोएब मलिक घटस्फोट घेणार असल्याची माहिती सर्वप्रथम दिली होती. एका कार्यक्रमादरम्यान शोएबने सानियाचा विश्वासघात केल्याचा दावा करण्यात आला. पण, या प्रकरणी सानिया आणि शोएब यांनी अधिकृतपणे कोणतेही भाष्य केलेले नाही. या दोघांचे काही व्यावसायिक करार आहेत, त्यामुळे अशी अधिकृत घोषणा होणार नसल्याचे सांगण्यात येत होते. मात्र घटस्फोटाएवजी नव्या कार्यक्रमाची घोषणा झाली आहे. त्यामुळे सर्व अचंभित झाले आहेत.

पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिकचे (Pakistan Cricketer) नाव मॉडल आएशा उमरशी (Ayesha Omar) जोडले जात आहे.
त्यांच्या फोटोशूटची बरीच चर्चा झाली, फोटोही व्हायरल झाले. नंतर शोएब आणि आएशा एकमेकांना डेट करत असल्याच्या बातम्या बाहेर आल्या होत्या,
त्यामुळेच सानिया आणि शोएब घटस्फोट घेणार आहेत अशी चर्चा रंगली होती. मात्र आता ‘मिर्झा मलिक शो’ची घोषणा झाली आहे, त्यामुळे सस्पेन्स वाढला आहे.
दोघं खरंच घटस्फोट (Saniya and Shoaib Divorce) घेत आहेत? दोघांमध्ये सर्व सुरळीत आहे ना? असे प्रश्न अनेकांना पडले आहेत.
या सर्व प्रश्नांची उत्तरं टॉक शोमधून मिळतील, असा अंदाज वर्तवला जात आहे.

 

Web Title :- Sania and Shoaib Divorce | sania mirza shoaib malik divorce saga gets new twist star couple to host tv show together

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

T20 World Cup | पाकिस्तानच्या PM ने केलेल्या ट्विटवर इरफानचे सडेतोड उत्तर, म्हणाला ” तुमच्यात आणि आमच्यात….”

Uddhav Thackeray | नाशकात ठाकरे गटात घरवापसी सत्र सुरु

CM Eknath Shinde | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विरोधकांवर टीकास्त्र, म्हणाले – ‘अनेक विकासकामे केली त्यामुळे विरोधकांना…’