साेनिया गांधी यांची काँग्रेसच्या ‘अंतरिम’ अध्यक्षपदी निवड

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आज काँग्रेस कार्यकारिणीच्या दिल्लीतील मुख्यालयात बैठक पार पडलेल्या बैठकीत काँग्रेसने आपल्या पक्षाच्या अध्यक्षपदासंबंधी निर्णय घेतला असून अनपेक्षितपणे सोनिया गांधी यांची निवड काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षपदी करण्यात आली आहे. मागील अनेक दिवसांपासून काँग्रेस अध्यक्षपदासंबंधी तर्कवितर्क बांधले जात होते. या चर्चांना आता काही काळासाठी तरी विराम मिळाला आहे.

याआधी १४ मार्च १९९८ पासून १६ डिसेंबर २०१७ एवढा जवळपास १९ वर्षे ६ महिन्यांच्या दीर्घ कालावधीत त्यांनी काँग्रेस अध्यक्षपदाची धुरा सांभाळली होती. आता पुन्हा एकदा तात्पुरत्या काळासाठी त्यांनी ही जबाबदारी स्वीकारत पक्षाची कमान आपल्या हाती घेतली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार कार्यकारिणीच्या झालेल्या बैठकीत नेत्यांनी पुन्हा एकदा राहुल यांनाच अध्यक्षपदी राहण्याची गळ घातली. राहुल सहमत नसल्यास प्रसंगी काही नेत्यांनी अध्यक्षपदासाठी प्रियंका गांधी यांचे नाव घेतले. काही नेत्यांनी ज्योतिरादित्य सिंधिया, मुकुल वासनिक आणि इका-दुक्का यांचेही नाव घेतले गेले मात्र अंतिमतः हंगामी अध्यक्ष म्हणून सोनिया यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले.

लोकसभा निवडणुकीमध्ये झालेल्या निराशाजनक पराभवानंतर राहुल गांधी यांनी २५ मे रोजी झालेल्या काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत आपल्या अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर अनेकजणांनी राहुल यांना मानविण्याचा प्रयत्न केला मात्र ते आपल्या राजीनाम्यावर ठाम राहिले. तसेच, गांधी परिवारातील व्यक्ती किंवा प्रियंका गांधी सुद्धा काँग्रेसच्या अध्यक्षपदी असणार नाही, असेही अनेकदा राहुल गांधी यांनी स्पष्ट केले होते. त्यानंतरदेखील सोनिया गांधींची निवड झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

आरोग्यविषयक वृत्त

You might also like