Sania Mirza Divorce | अखेर पाकिस्तानी अभिनेत्री आयेशा ओमर हिने शोएब मलिक सोबतच्या ‘त्या’ फोटो बद्दल केला खुलासा

पोलीसनामा ऑनलाइन : सध्या भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झा (Sania Mirza Divorce) आणि तिचा पती पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक यांच्या घटस्फोटाची चर्चा जोरात सुरू आहे. काही दिवसात ते घटस्फोट घेणार हे ठरले आहे. तर हे दोघे वेगळे होण्यामागचे कारण पाकिस्तानी अभिनेत्री आयेशा ओमर हिला समजले जात होते. आयेशा आणि शोएबने काही बोल्ड फोटोशूट केल्यामुळे या चर्चांना उधाण आले होते. मात्र आता शेवटी आयेशाने यावर मौन सोडत एका मुलाखतीत हे फोटोशूट एका जाहिरातीसाठी करण्यात आल्याचे उघड केले आहे.

सानिया मिर्झा (Sania Mirza Divorce) आणि शोएब मलिक या दोघांचे वैवाहिक जीवन संपुष्टात येण्यामागे आयेशा ही जबाबदार असल्याचे सांगितले जात होते. तर शोएब आणि आयेशा एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चांना देखील उधाण आले होते. त्यानंतर आता आयेशाने एका मुलाखतीत या संपूर्ण गोष्टीचा खुलासा करत यावर मौन सोडले आहे.

पुढे बोलताना आयेशा म्हणाली की, “हे फोटोशूट एका जाहिराती दरम्यान काढण्यात आलेले होते.
मला हे कळत नाही की या फोटोशूटचे फोटोज लोक घटस्फोटाच्या प्रकरणाशी का जोडत आहेत.
फोटोशूट हे प्रोफेशनल भाग आहे पण लोक रोमँटिक फोटोला अफेअर शी जोडत आहेत.
मला विवाहबद्ध अफेअरला अजिबात पाठिंबा द्यायला आवडत नाही”. सध्या आयेशाचे हे वक्तव्य सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

Web Title :- Sania Mirza Divorce | sania mirza divorce pakistani actress ayesh omar revealed intimate photoshoot with shoaib malik

Advt.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Aaditya Thackeray | दिशा सालियन प्रकरणावरून आदित्य ठाकरेंनी मौन सोडले, म्हणाले ‘8 जूनच्या रात्री…’

Mukta Tilak Funeral | आमदार मुक्ता टिळक यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

Army Jawans Killed In Road Accident | सिक्कीमध्ये लष्कराची बस दरीत कोसळली; 16 भारतीय जवानांचा मृत्यू