Advt.

Sania Mirza | सानिया मिर्झाच्या मुलाची तब्येत बिघडली, शोएब मलिक बांग्लादेश दौ-याहून रवाना

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Sania Mirza | इंडियन टेनिसपट्टू सानिया मिर्झाचा (Sania Mirza) मुलगा इजहानची (Izhan) तब्येत बिघडली आहे. यामुळे सानिया मिर्झाचा पती पाकिस्तान क्रिकेटपट्टू शोएब मलिक (Shoaib Malik) यांनी बांग्लादेशदौरा सोडून लवकरच दुबईला (Dubai) रवाना झाला आहे. मुलाची तब्येत बिघडल्याने शोएब मलिकला बांग्लादेशचा दौरा अर्धवट सोडावा लागला आहे. त्यामुळे आता शोएब मलिक बांग्लादेश विरुद्ध (Pakistan vs Bangladesh) होणारा तिसरा टी-20 सामना खेळणार नसल्याचं समजते.

 

सध्या पाकिस्तान टीम बांग्लादेश दौ-यावर आहे. तीन टी- 20 सामन्यांची मालिकेत पाकिस्ताननं यापूर्वीच 2-0 नं आघाडी घेतलीय. शोएब त्याची पत्नी सानिया (Sania Mirza) आणि मुलगा इजहानसह दुबईत राहतो. इजहानचा जन्म 2018 साली झाला असून तो आता 3 वर्षांचा आहे. यापूर्वी यूएईमध्ये झालेल्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये सानिया मिर्झा शोएबला प्रोत्साहन देण्यासाठी स्टेडियममध्ये उपस्थित होती.

 

दरम्यान, शोएब मलिक (Shoaib Malik) सध्या दुबईला (Dubai) रवाना झाला आहे.
त्यामुळे त्याला तिसरा टी-20 सामना खेळता येणार नाही.
दरम्यान, पाकिस्तान टीममधील अनुभवी खेळाडू असलेल्या मलिकने बांग्लादेश विरुद्धच्या सीरिजमध्ये निराशाजनक कामगिरी केली आहे.
पहिल्या टी-20 सामन्यामध्ये मलिकने निष्काळजीपणा दाखवला आणि रन आऊट झाला.
बांग्लादेशचा फास्ट बॉलर मुस्तफिजुर रहमानने टाकलेला बॉलवर मलिकने बचावात्मक फटका लगावला होता.
हा बॉल विकेट कीपर नुरुल हसनजवळ गेला, त्यावेळी शोएब क्रीजबाहेर उभा होता. मॉर्निंग वॉकला गेल्यासारखा मलिक क्रीजच्या बाहेर फिरत होता.

 

Web Title :- Sania Mirza | pakistan vs bangladesh shoaib malik will not be available for the 3rd t20i due to his sons illness sania mirza post marathi news policenama

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Anil Parab | शरद पवारांसोबत 4 तास चर्चा झाल्यानंतर विलीनीकरणाबाबत अनिल परबांची माहिती; म्हणाले…

Mansukh Hiren Murder Case | सचिन वाझेचा चौकशी समितीसमोर धक्कादायक खुलासा, म्हणाला – ‘त्या प्रकरणात मी फक्त प्यादा’

Rana Daggubati | राणा दग्गुबतीनं केलं सगळ्यांसमोर पत्नीला KISS, Video झाला व्हायरल