Sania Mirza-Peng Shuai | सानिया मिर्झाची ‘डबल्स’ची पार्टनर बेपत्ता, माजी उप पंतप्रधानांवर केला होता लैंगिंक छळाचा आरोप

बिजिंग : Sania Mirza-Peng Shuai | मागील काही दिवसांपूर्वी चीनची स्टार टेनिस खेळाडू आणि भारतीय स्टार सानिया मिर्झा (Sania Mirza) ची माजी जोडीदार पेंग शुआई (Peng Shuai) ने आपल्या देशातील एका मोठ्या नेत्यावर लैंगिक छळाचा आरोप केला होता, तेव्हापासून ती बेपत्ता आहे. मात्र, आपण सुरक्षित असल्याचा दावा करणार्‍या तिच्या संशयास्पद ईमेलमुळे सुरक्षेबाबत चिंता वाढली आहे. (Sania Mirza-Peng Shuai)

 

जगभरातील खेळाडूंना चिंता

चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाला या वादाबाबत काहीच माहिती नाही. जगभरातील खेळाडू या चीनी खेळाडूच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त करत आहेत. (Sania Mirza’s doubles partner goes missing, former deputy PM Zhang Gaoli accused of sexual harassment)

 

महिला टेनिस संघाने उपस्थित केला प्रश्न

सुमारे 2 आठवड्यांपूर्वी ग्रँडस्लॅम युगल चॅम्पियन पेंग शुआईने आरोप केला होता की, माजी उप पंतप्रधान झांग गाओली यांनी तिचे लैगिंक शोषण केले आहे. खेळाडू पेंग हिने हा गंभीर आरोप केल्यानंतर काही काळानंतर एक ईमेल पाठवला. (Sania Mirza-Peng Shuai)

 

या ईमेलमध्ये पेंगने म्हटले होते की, मी सुरक्षित आहे आणि लैंगिक छळाचे आरोप चुकीचे आहेत. यावर महिला टेनिस संघाचे सीईओ आणि अध्यक्ष स्टीव्ह सायमन (Steve Simon, CEO and president of the women’s tennis team) यांनी पाठवल्या गेलेल्या ईमेलच्या वैधतेवर प्रश्न उपस्थित केला आहे.

 

चीनकडून काढून घेतले जाईल टूर्नामेंटचे यजमानपद

चीनच्या सरकारी प्रसारण सीसीटीव्हीचे अंतरराष्ट्रीय युनिट सीजीटीएन (CGTN) ने हा ईमेल पोस्ट केला. सायमन यांनी म्हटले की, त्यांना विश्वास वाटत नाही की पेंग शुआईने स्वत: हा ईमेल लिहिला आहे.

 

परराष्ट्र मंत्रालयाचे वर्तनही संशयास्पद

त्यांनी प्रकरणाच्या पूर्ण चौकशीची मागणी केली आहे. सायमन यांनी म्हटले की, जर योग्य उत्तर मिळाले नाही चीनकडून टूर्नामेंटचे यजमानपद काढून घेऊले जाऊ शकते. याबाबत विचारले असता परराष्ट्र मंत्रालयाचा प्रवक्ता झाओ लिजियन (Foreign Ministry spokesman Zhao Lijian) यांनी म्हटले की, हे प्रकरण डिप्लोमॅटिक प्रश्न नाही आणि त्यांना स्थितीची माहिती नाही.

 

व्हेअर इज पेंग शुआई ट्रेंड #Whereisthepengshuai

पेंग गायब झाल्यानंतर सोशल मीडियावर व्हेअर इज पेंग शुआई ट्रेंड करत आहे. नाओमी ओसाका, नोवाक जोकोविच, सेरेना विलियम्सने (Naomi Osaka, Novak Djokovic, Serena Williams) सुद्धा या प्रकरणावर ट्विट केले.

 

जागतिक पातळीवर हालचाली

सेरेनाने लिहिले आहे की, ती या वृत्ताने अतिशय हैराण आणि दुखी आहे.
तिने म्हटले की, आपण गप्प बसले नाही पाहिजे.
या प्रकरणाचा तपास झाला पाहिजे. तर आंतरराष्ट्रीय टेनिस महासंघाच्या प्रवक्ता हिथर बोलेर यांनी सांगितले की,
त्या चीनी टेनिस संघाच्या संपर्कात आहेत आणि डब्ल्यूटीए आणि आंतरराष्ट्रीय ऑलम्पिक समितीसोबत सुद्धा चर्चा केली जात आहे. (Sania Mirza-Peng Shuai)

 

सानिया आणि पेंगची जोडी गाजली (Sania Mirza-Peng Shuai)

पेंग भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झाची जोडीदार सुद्धा होती आणि तिने सानियाविरूद्ध सुद्धा अनेक सामने खेळले आहेत.
2017 मध्ये चायना ओपनमध्ये पेंग आणि सानिया जोडी सेमीफायनलपर्यंत पोहचली होती.

 

Web Title :- Sania Mirza-Peng Shuai | sania mirza doubles partner peng shuai missing after accused senior government figure of sexual assault marathi news policenama

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा