पोलीसनामा ऑनलाईन : Sania Mirza | भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झाला अबु धाबी ओपन 2023 च्या स्पर्धेत (Abu Dhabi Open 2023) पहिल्याच फेरीत पराभवाचा धक्का बसला आहे. या पराभवामुळे सानिया मिर्झा स्पर्धेतुन बाहेर पडली आहे. अमेरिकन जोडीदार बेथानी माटेक सँडसोबत ती या स्पर्धेमध्ये खेळत होती. सानिया आणि बेथानी यांना पहिल्या फेरीत बेल्जियमच्या कर्स्टन फ्लिपकेन्स आणि लॉरा सिगमंड या जोडीकडून 3-6, 4-0 असा पराभव पत्करावा लागला. (Sania Mirza)

या स्पर्धेत सानिया मिर्झा आणि बेथानी यांना सुरुवातीच्या सेटमध्ये दुसऱ्या गेमला सर्विस गमवावी लागली. त्यानंतर पुढच्या गेममध्ये आक्रमक खेळ केला. पण फ्लिपकेन्स आणि सिगमंड यांनी सहाव्या गेममध्ये पुन्हा वर्चस्व मिळवलं आणि सानिया-बेथानी यांच्या जोडीवर दबाव टाकला. दुसऱ्या सेटमध्ये यांच्यामध्ये अटीतटीची लढत बघायला मिळाली. नवव्या गेममध्ये सानिया आणि बेथानीने पुन्हा सर्व्हिस गमावली. हा गेम एक तासाहून अधिक काळ चालला या सामन्याच्या दहाव्या गेममध्ये फ्लिपकेन्स आणि सिगमंड यांनी सानिया आणि बेथानी या जोडीचा पराभव करत विजय मिळवला. (Sania Mirza)
सानियाने काही दिवसांपूर्वी टेनिसमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. ती दुबई टेनिस चॅम्पियनशिप स्पर्धेत अखेरचं कोर्टवर उतरणार आहे. दुबई टेनिस चॅम्पियनशिप स्पर्धेला 27 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. सानिया मिर्झाने निवृत्तीनंतर दुबईमध्ये असलेल्या तिच्या टेनिस अकादमीवर लक्ष केंद्रित करणार आहे. सानिया मिर्झाने वयाच्या 18 व्या वर्षी म्हणजेच 2005 मध्ये मेलबर्नमधून केली होती. सानियाने आपल्या कारकिर्दीत महिला दुहेरीत तीन आणि मिश्र दुहेरीत तीन ग्रँडस्लॅम जिंकले आहेत. तसेच 2016 च्या ऑलिम्पिक स्पर्धेत तिने सेमी फायनलमध्ये धडक मारली होती.
Web Title :- Sania Mirza | sania mirza lost in womens doubles tennis abu dhabi open 2023
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update