‘कुकिंग’चे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करणाऱ्यांवर ‘भडकली’ ‘टेनिसपटू’ सानिया मिर्झा !

पोलीसनामा ऑनलाईन :सध्या देशात लॉकडाऊन आहे. जगभरातील देश सध्या कोरोनानं त्रस्त आहेत. पाकिस्तानातही कोरनानं पाय रोवला आहे. तिथलीही स्थिती अवघड झाली आहे. अनेकांवर या परिस्थितीनं उपासमारीची वेळ आहे. आहे. अशात काही लोक सोशलवर कुकींगचे व्हिडीओ शेअर करताना दिसत आहेत. टेनिसपटू सानिया मिर्झा अशा व्हिडीओ बनवणाऱ्या लोकांवर संतापली आहे.

सानियानं एक ट्विट केलं आहे. यात ती म्हणते, “अजूनही तुमचं खाण्या-पिण्याचे व्हिडीओ बनवून आणि जेवणाच्या थाळ्यांचे फोटो पोस्ट करून मन भरलं नाही का ? जगभरात खास करून आशियाई उपखंडात अनेक लोक असे आहेत ज्यांना नशीबाची साथ असेल तर एक वेळचे जेवायला मिळते. कितीतरी लोक सध्या उपासमारीनं मृत्यूमुखी पडत आहेत. अशी परिस्थिती असतानाही असे व्हिडीओ पोस्ट करणं कितपत योग्य आहे.”

सानियानं रोजानं काम करणाऱ्या कामगारांना जेवण आणि मुलभूत वस्तू पुरवण्याचा निर्धार केला आहे. यासाठी तिनं एक चळवळ उभी केली आहे. सानिया म्हणते, “संपूर्ण जग सध्या आव्हानात्मक परिस्थितीतून जात आहे. आपण घरात सुरक्षित आहोत हे आपलं नशीब आहे. परंतु अनेकांचं यामुळं नुकसान होत आहे. ज्यांचं हातावर पोट आहे त्यांचं खूपच कठिण झालं आहे. त्यांची काळजी घेणं ही आपली जबाबदारी आहे. त्यामुळं जमेल तसं आपापल्या परीनं त्यांची मदत करा.” असंही तिनं सांगितलं.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like