सानिया मिर्झाला भारतीय म्हणाले ‘धन्यवाद’ तर पाकिस्तानी म्हणाले ‘वहिनी तर रॉ एजंट’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आयसीसी क्रिकेट वर्ल्डकपमध्ये रविवारी भारत आणि पाकिस्तानमध्ये सामना झाला. या सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तानचा ८९ धावांनी पराभव करत या स्पर्धेत आपली विजयी मालिका कायम राखली आहे. या सामन्यात पराभूत झाल्यानंतर पाकिस्तानच्या चाहत्यांनी मोठ्या प्रमाणावर संघावर टीका केली होती. १९९२ पासून सलग सात वेळा भारतीय संघाने वर्ल्डकप स्पर्धेत पाकिस्तानला पराभूत केले आहे. सततच्या पराभवामुळे वैतागलेल्या एक पाकिस्तानच्या चाहत्याने पाकिस्तानी संघाचा सामन्याच्या आदल्या रात्रीचा पार्टी करतानाच व्हिडीओ पोस्ट केला आहे.

या व्हिडिओत पाकिस्तानी क्रिकेटर पार्टी करताना दिसून येत आहेत. यासंदर्भातील काही फोटो आणि व्हिडिओ सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाले आहेत. या व्हिडिओत भारतीय टेनिस खेळाडू सानिया मिर्झा आपला पती शोएब मलिक याच्याबरोबर हुक्का पार्लरमध्ये पार्टी करताना दिसून येत आहे. त्यामुळे आधीच पराभवामुळे चिडलेले पाकिस्तानी पाठीराखे आता या व्हिडीओ आणि फोटोंमुळे अधिकच चिडलेले दिसून येत आहेत.

दरम्यान, हा व्हिडीओ आणि फोटो व्हायरल झाल्यानंतर पाकिस्तानी पाठिराख्यांनी सानिया मिर्झा हिच्यावर टीका करताना तिला पराभवाला जबाबदार धरले आहे. त्याचप्रमाणे शोएब मलिक याने आता क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारावी. असे देखील काही जणांनी यावर प्रतिक्रिया देताना म्हटले आहे. तर भारतीयांनी सानियाला धन्यवाद वहिनी असं म्हटलं आहे. तर पाकिस्तानी चाहत्यांनी तिला एजंट म्हटले आहे. त्यामुळे या पराभवानंतर सानिया मिर्झा मोठ्या प्रमाणावर ट्रोल होताना दिसून येत आहे.

आरोग्यविषयक वृत्त

स्मरणशक्‍ती वाढविण्यासाठी आणि व्यसन सोडवण्यासाठी ‘हे’ आसन कराच

‘सर्वांगासन’ केल्याने मिळते मनःशांती

महिलांसाठी ‘योग’साधना अतिशय महत्वाची

तुम्हाला तुमची ‘उंची’ वाढवायचीय, मग फक्‍त ‘हे’ असान कराच

वयोवृद्धांसाठी ‘योगा’ हे ‘वरदान’च

योगा कराच ! पण ‘हे’ नक्‍की समजून घ्या

‘योग’ साधनेची सुरुवात करा वज्रासनाने, मिळवा ‘हे’ फायदे

‘अपचना’चा त्रास असणाऱ्यांसाठी ‘हे’ आसन ठरतय ‘रामबाण’ उपाय

Loading...
You might also like