पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिकच्या निवृत्‍तीवर पत्नी सानिया मिर्जाचं ‘ट्विट’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – पाकिस्तानचा प्रसिद्ध क्रिकेटर शोएब मलिकने शुक्रवारी वन डे इंटरनॅशनल क्रिकेटमधून निवृत्त झाला आहे. याबाबत त्याची पत्नी आणि भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्जाने ट्विट केले आहे की, ‘जीवनातील प्रत्येक शेवट एक नवीन सुरूवात आहे.’

सानिया मिर्जाने ट्विट केले की, ‘प्रत्येक कहानीचा अंत होत असतो पण जीवनातील प्रत्येक शेवट एक नवीन सुरूवात आहे. शोएब मलिक अभिमानाने आपल्या देशासाठी २० वर्ष क्रिकेट खेळला. शोएब तुम्ही जे मिळवले आहे आणि तुम्ही जे आहात, यासाठी मुलगा इजान आणि मला अभिमान आहे.’

शोएब मलिकने ट्विट करुन वन डे इंटरनॅशनल क्रिकेटमधून निवृत्त होण्याची घोषणा केली होती, त्याने लिहले की, ‘आज मी वन डे इंटरनॅशनल क्रिकेटमधून निवृत्त होत आहे. ज्या क्रिकेटरसोबत मी खेळलो, ज्यांच्याकडून मी ट्रेनिंग घेतली त्याचबरोबर परिवार, मित्र, मिडीया आणि स्पॉन्सर आपल्या सगळ्यांचे आभार. आणि सगळ्यात महत्वाचे माझे चाहते. मी त्यांच्यावर खूप प्रेम करतो.’

वर्ल्ड कप २०१९ मध्ये शोएब मलिकचे प्रदर्शन काही ठिक नव्हते. शोएब मलिक ३ मॅच खेळला आणि त्यामध्ये फक्त ८ रन केले. मलिकने त्याची शेवटची मॅच भारताच्या विरोधात खेळली होती ज्यामध्ये एकही रन न करता तो आउट झाला होता.

आरोग्यविषयक वृत्त

घरी तयार केलेले लोणी चवीसह देते आरोग्य !

‘या’ १३ आरोग्य समस्यांवर आहेत ‘हे’ रामबाण उपाय

पावसाळ्यात काजळाने होते इन्फेक्शन ! अशी घ्या काळजी

केसगळतीच्या समस्येवर ‘हे’ घरगुती उपाय ठरतील वरदान

दररोज ४ काजू, ८ मनुका सेवन करा, झटपट बरे होतील ‘हे’ आजार

रात्री उशिरापर्यंत जागणाऱ्या पुरुषांना येऊ शकते ‘नपुंसकत्व’

‘पांढरे डाग’ घालवण्याचे घरगुती उपाय

असा दूर करा ‘विसरभोळेपणा’, जगा आनंदी आयुष्य

व्हिटॅमिन ‘डी’च्या कमतरतेमुळे लहान मुलांना होऊ शकतो ‘हाय बीपी’चा धोका