…म्हणून सानिया मिर्झा, वीना मलिक यांच्यात ट्विटरवर ‘जुंपली’, पुढे झालं ‘असं’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सानिया मिर्झा आणि पाकिस्तानी एक्ट्रेस वीना मलिक यांच्यात ट्विटरवर वॉर सुरु झाले आहे. पाकिस्तान विरुद्ध भारत अशी क्रिकेट मॅच झाल्यावर काही व्हिडिओ व्हायरल होत आहेत. हे पाहून सांगितले जात आहे की पाकिस्तानी खेळाडू मॅचच्या आदल्या दिवशी इंग्लंडच्या रेस्टॉरंटमध्ये डिनरसाठी गेले होते.

पाकिस्तनाने मॅच हरल्यानंतर पाकिस्तानी चाहते भलतेच भडकले आहेत. म्हणण्यात येत आहे की पाकिस्तानी खेळाडूंना त्यांच्या फिटनेसची अजिबात काळजी नाही. त्यानंतर वीना मलिकने सानिया मिर्झा जंक फुड असलेल्या रेस्टॉरंटमध्ये आपल्या मुलाला घेऊन जात असल्याने टीका केली आहे. यावरुन आता सानिया मिर्जा आणि वीना मलिक या सोशल मिडियावर एकमेकींवर टीका करत आहेत.

वीना मलिकने ट्विट करत टीका केली आहे की, सानिया, मी तुमच्या मुलासाठी खूप चिंतीत आहे. तुम्ही लोक तुमच्या मुलाला घेऊन हुक्का पार्लर मध्ये जातात, हे त्याच्यासाठी धोकादायक नसू शकते का ? आर्ची हे रेस्टॉरंट जंक फुडसाठी ओळखले जाते. हे खेळाडूंसाठी आणि लहान मुलांसाठी चांगले नाही. तुम्हाला माहित नाही का की तुम्ही स्वत: एक खेळाडू आहेत. अशी टीका वीना मलिकने केल्यानंतर त्यावर प्रतिउत्तर म्हणून सानियाने देखील ट्विट केले.

सानिया मिर्झाने ट्विट केले की, वीना, मी माझ्या मुलाला हुक्का पार्लरला घेऊन गेले नव्हते. तुला आणि बाकी कोणाही चिंता करण्याची गरज नाही की मी माझ्या मुलाचा सांभाळ कसा करते. दुसरी गोष्ट अशी की, ना की मी पाकिस्तानी क्रिकेट टीमची डाइटीशियन आहे ना की त्यांची आई, प्रिंसिपल आणि टीचर. असे ट्विट करत सानिया मिर्झाने वीना मलिकला प्रतिउत्तर दिले.

भारताने पाकिस्तानला मॅचमध्ये हरवल्यानंतर पाकिस्तानी क्रिकेट प्रेमी भलतेच भडकले आहेत आणि पाकिस्तानी खेळाडूंवर या ना त्या मार्गाने टीका करत आहेत.

आरोग्य विषयक वृत्त

महिलांसाठी “योगाचे” महत्व जास्त

आलेला ताप हा साधारण ताप समजू नका. डॉक्टरांना दाखवून त्या तापाचे लवकर निदान करा

“ऍसिडिटीने” त्रस्त असणाऱ्यांसाठी रामबाण उपाय

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like