Sania Mirza-Varun Dhawan | वरूण धवनने सांगितला सानिया मिर्झाशी झालेल्या पहिल्या भेटीचा किस्सा

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Sania Mirza-Varun Dhawan | सध्या अभिनेता वरूण धवन आणि अभिनेत्री क्रिती सेनॉन (Actress Kriti Sanon) त्यांच्या आगामी ‘भेडिया’चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. अभिनेता वरूण धवन याने आपल्या अभिनयाने बॉलीवूडमध्ये एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. वरूणचे अनेक चाहते देखील आहेत. एका मुलाखती दरम्यान वरूणने एका मोठ्या गोष्टीचा खुलासा केला आहे. यावेळी खुद्द वरूणनेच टेनिसपटू सानियाशी पहिल्या भेटीचा खुलासा केला आहे. (Sania Mirza-Varun Dhawan)

 

एकेकाळी अभिनेता वरूण धवनला स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा फार आवडायची. तिच्या पहिल्या भेटीचा किस्सा वरूणने एका मुलाखती दरम्यान सांगितला. यावेळी बोलताना वरूण म्हणाला, “मुकुल आनंदच्या प्रोडक्शन हाऊस मध्ये इंटर्नचे काम करत असताना सानिया मिर्झा सोबत जाहिरात शूटिंगचे काम चालू होते. तेव्हा त्यांचं पहिलं काम बुटांच्या 300 जोड्या आणणं होतं. यावेळी सानियाने मला सफरचंद आणायला सांगितले. मी सफरचंद आणल्यानंतर सानियाच्या आईला मी सफरचंद दिले आणि म्हणालो, ‘आंटी सफरचंद’. (Sania Mirza-Varun Dhawan)

 

तेव्हा त्यांनी विचारलं की, तुला हे सफरचंद आणायला कोणी सांगितलं ? मी सानियाच नाव सांगितलं त्यावर तिची आई म्हणाली, ‘माझी मुलगी सफरचंदच खात नाही’. आणि इतक्यात सानिया तिथे आली आणि तिने सफरचंद आणायला सांगितलं होतं असं ती तिच्या आईला म्हणाली. या कामासाठी मला पाच हजार रूपये देखील मिळाले होते. मात्र यावेळी सानियाच्या आईला मी वेडा आहे असं वाटलं होतं. संपूर्ण प्रकार ऐकताच प्रेक्षकांच्या भुवया मात्र उंचावल्या.

नुकताच वरूणने बॉलीवूडमध्ये पदार्पण करून एक दशक पूर्ण केले आहे.
‘स्टुडन्ट ऑफ द इयर’ या चित्रपटामधून वरूणने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.
यानंतर वरूणने ‘हम्प्टी शर्मा की दुल्हनिया’, ‘बदलापूर’, ‘एबीसीडी 2’, ‘बद्रीनाथ की दुल्हनिया’
आणि ‘जुडवा 2’ यासारखे ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आहेत.

 

Web Title :- Sania Mirza-Varun Dhawan | sania mirzas mother scolded varun dhawan for bringing her fruit know details

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Prateik Babbar | एका मुलाखतीत प्रतीक बब्बरने त्याच्या भूतकाळातील अनेक गोष्टींचा केला धक्कादायक खुलासा; म्हणाला…

Aai Kuthe Kay Karte | अभिनेते मिलिंद गवळी यांच्या पोस्टने वेधले लक्ष ; “एका जन्मात अनेक जन्म……

T20 World Cup 2024 | ICC कडून टी-20 विश्वचषक 2024 च्या फॉरमॅटमध्ये मोठा बदल; जाणून घ्या