शोएबच्या ट्वीटवर सानियानं दिलं असं उत्तर 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारत आणि पाकिस्तानमध्ये काही दिवसांपासून तणावाचे वातावरण आहे. त्यामुळे भारतीय कलाकार, राजकारणी, क्रिडा क्षेत्रातील सर्व दिग्गजांनी यावर आपापल्या भावना व्यक्त केल्या. तर दुसरीकडे पाकिस्तानमधील खेळाडूंसह कलाकारांनीही यावर प्रतिक्रिया दिली.

टेनिस स्टार सानिया मिर्झानेही अभिनंदनचं स्वागत केलं. “विंग कमांडर अभिनंदन तुमचं स्वागत आहे. तुम्ही खऱ्या अर्थाने आमचे हिरो आहात. तुम्ही जे शौर्य दाखवलंयत्यासाठी देशाचा तुम्हाला सलाम. जय हिंद.” असं ट्वीट सानियाने केलं. सानियाच्या ट्वीटला वेगळ महत्त्वही आहे. कारण सानिया मिर्झाचे पती आणि पाकिस्तानचे क्रिकेटर शोएब मलिक यांच्या ट्वीटला सानियाचे हे उत्तर आहे, असं समजलं जात आहे.

भारतीय विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना पाकिस्ताने पकडल्यानंतर शोएब मलिकने जे ट्वीट केलं होतं. त्याला सानियाचे ट्वीट उत्तर आहे. शोएब मलिकने पाकिस्तानी वायूसेनेचं कौतुक करत, पाकिस्तान जिंदाबाद, असं ट्वीट त्याने केले होते. त्यावर सोशल मीडियावर शोएबला ट्रोल करण्यात आले होते. तसंच सानियालाही ट्रोल करण्यात आले. कारण शोएबने ट्वीट केल्यानंतर सानियाने काही प्रतिक्रिया दिली नव्हती.

सानियाचा पती पाकिस्तानी असल्यामुळे ती शांत असल्याचा आरोप तिच्यावर करण्यात आला. पण विंग कमांडर अभिनंदन यांच्या वापसीनंतर सानिया मिर्झाने, जय हिंद म्हणत त्यांचे स्वागत केलं.