120 वेळा वापरता येतं एकच ‘सॅनिटरी नॅपकिन’, ‘किंमत’ असेल फक्त 199 रुपये

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आयआयटी दिल्ली अखत्यारित सुरु झालेल्या एका स्टार्टअपकडून फायबरचा एक अनोखा सॅनिटरी नॅपकिन लॉन्च करण्यात आला आहे. ज्याला 120 वेळा वापरले जाऊ शकते हीच त्या नॅपकिनची विशेषता आहे. म्हणजेच हे नॅपकिन रियूजेबल असून ते 2 वर्षांपर्यंत चालते. Sanfe ने आयआयटी दिल्लीचे प्रोफेसर यांच्या सोबत मिळून हे सॅनिटरी नॅपकिन तयार केले आहे. दोन नॅपकिन असलेल्या पॅकची किंमत 199 रुपये असणार आहे. यासाठी या समूहाने पेटेंट देखील फाइल केले आहे.

हे स्टार्टअप हॅरी सहरावत आणि अर्चित अग्रवाल यांनी मिळून सुरु केले होते. IIT Delhi मधून त्यांनी इंजिनियरिंग केले. अर्चित अग्रवाल यांनी सांगितले की, अधिकतर सॅनिटरी नॅपकिन सिंथेटिक मेटेरिअल आणि प्लास्टिकपासून तयार करण्यात आलेले असतात. ज्याला नष्ट करण्यासाठी 50 – 60 वर्षांचा कालावधी लागतो. अनेकदा हे उघड्यावर फेकले जातात किंवा जाळले जातात. यामुळे पर्यावरणाचे नुकसान होते. तसेच अनेक समस्या उद्भवतात.

आयआयटी दिल्लीच्या विद्यार्थ्यांनी stand and pee हे डिवाइस तयार करण्यात आले आहे. sanfe यांनी Sanitation for female नावचे हे डिवाइस आहे, यूज अ‍ॅन्ड थ्रो असलेल्या या डिवाइसची किंमत फक्त 10 रुपये आहे. यात वापरण्यात आलेेले मटेरिअल बायोडिग्रेडेबल आहे. याने कोणताही कचरा न होता पर्यावरणाचे नुकसान होत नाही. महिला हे डिवाइस पीरियड दरम्यान देखील वापरु करु शकतात.

या स्टार्टअपकडून तयार करण्यात आलेल्या रियूजेबल सॅनिटरी नॅपकिनला तुम्ही साफ देखील करु शकतात. यामुळे सॅनेटरी नॅपकिनने होणारा कचरा कमी होईल. या डिवाइसला ‘Cleanse Right’ नाव देण्यात आले आहे.
आरोग्यविषयक वृत्त –