कर्तव्य दक्ष मुख्याधिकारी कंकाळ यांनी राबविले स्वच्छता अभियान

मुरबाड : पोलीसनामा ऑनलाइन – मुरबाड नगरपंचायत अंतर्गत स्वच्छता मोहीम राबविण्यात येत असून मुरबाड नगरपंचायतिचे सफाई कामगार कोव्हिडची कोणतीही पर्वा न करता स्वच्छते मध्ये कोणताही खंड न पाडता कर्तव्य पार पाडत होते यातच स्वच्छ सर्वेक्षण २०२१ आणि माझी वसुंधरा अभियाना अंतर्गत मुरबाड नगरपंचायतीच्या वतीने श्रावस्ती नाट्यसंस्था ठाणे आयोजित पथनाट्यतुन स्वच्छता जनजागृती करण्यात आली यावेळी प्रयोगाचे उदघाटन आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते झाले.

मुरबाड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात ‘चला पृथ्वीचे रक्षण करूया’ व ‘आपले मुरबाड शहर स्वच्छ आणि सुंदर ठेऊया’या विषयांवर पथनाट्ये आणि जनजागृती प्रयोग सादर करून स्वच्छता संदर्भात महत्त्व पटवून देण्यात आले.

मुरबाड शहर स्वच्छ व सुंदर कसे राहील या उद्देशाने जनजागृती होण्यासाठी सादर करण्यात आलेल्या या पथनाट्या मधून स्वछता जनजागृती, तंबाखु-गुटखा याचे दुष्परिणाम, कोरोना विषयक नियमांची अंमलबजावणी, पर्यावरण रक्षणासाठी झाडे वाचवा, पाणी वाचवा आशा विविध विषयांन वर पथनाट्य सादर करून मुरबाड शहर स्वच्छ व सुंदर करण्यासाठी नागरिकांचा मोठा सहभाग आवश्यक असल्याचा संदेश पथनाट्यातुन दिला.

या वेळी आमदार किसन कथोरे, नगर पंचायतीचे मुख्यधिकारी परितोष कंकाळ, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोराटे, शहर स्वच्छता समनव्यक जगदीश पवार, आरोग्य विभागाचे संदीप देसले, ‘मी पण स्वछताग्रही’चे स्वयंसेवक, नगरपंचायत कर्मचारी वृंद,सफाईकामागर, मुरबाड नगरपंचायती मा. नगराध्यक्ष वैभव भोसले, मोहन सासे, मा. उपनगराध्यक्ष नारायण गोंधळी यान सह पथनाट्य प्रयोगाला मुरबाडकरांनी प्रतिसाद दिला.